वय १९ वर्ष इन मीन आणि दाखल गुन्हे दोनशे तीन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 10:17 PM2019-11-06T22:17:20+5:302019-11-06T22:18:49+5:30

पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना गेल्या अनेक वर्षांपासून दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी करुन गुंगारा देऊन धुमाकुळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोरास त्याच्या दोन साथीदारासह हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे़. पैतरसिंग उर्फ पवित्रसिंग टाक याचे आता वय १९ वर्षाचे असले तरी त्याच्यावर २०३ गुन्हे आहेत़.

Age 19 year old boy with registered offenses two hundred three | वय १९ वर्ष इन मीन आणि दाखल गुन्हे दोनशे तीन 

वय १९ वर्ष इन मीन आणि दाखल गुन्हे दोनशे तीन 

Next

पुणे : पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना गेल्या अनेक वर्षांपासून दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी करुन गुंगारा देऊन धुमाकुळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोरास त्याच्या दोन साथीदारासह हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे़. 

 याबाबत पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, उपायुक्त सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी माहिती दिली. पैतरसिंग उर्फ पवित्रसिंग टाक याचे आता वय १९ वर्षाचे असले तरी त्याच्यावर २०३ गुन्हे आहेत़. त्यातले ८६ गुन्हे हे अल्पवयीन असताना दाखल झाले आहेत. पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना गेल्या अनेक वर्षांपासून दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी करुन गुंगारा देऊन धुमाकुळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोरास त्याच्या दोन साथीदारासह हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे़. याशिवाय त्याच्यावर बाल गुन्हेगार म्हणून अनेक गुन्हे दाखल होते़. अगदी वयाच्या १२ -१३ वर्षाचा असल्यापासून तो वडिलांबरोबर गुन्हे करु लागला़. त्याचे वडिल गब्बरसिंग टाक याच्यावर १५० हून अधिक गुन्हे होते़. पवित्रसिंग याचा चुलता गागासिंग टाक याच्यावरही १०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत़.  त्याचा चुलत भाऊ गोरखसिंग टाक हा सध्या तुरुंगात असून त्याच्यावरही असंख्य गुन्हे आहेत़.  त्याचा भाऊ तिलकसिंग गब्बरसिंग टाक हा सध्या जामीनावर सुटका असून त्याच्यावरही १०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत़.  विशेष म्हणजे त्याच्या आईवरही गुन्हे दाखल आहेत़.  रामटेकडी भागात ते राहतात़ तेथे त्यांची दहशतही आहे़. 


सदैव शस्त्रधारी, वेगाची नशा
पैतरसिंग याला गाड्यांची प्रचंड क्रेझ आहे़.  तो बाहेर पडताना शस्त्र जवळ बाळगत असतो़. चोऱ्या करण्याबरोबरच वेगवेगळ्या कार वेगाने चालविण्याची नशा आहे़.  तो वेगाने गाड्या पळवत असे़.  त्याला पकडणे अनेकदा पोलिसांना शक्य झाले नाही़.  तो जशी वेगाने गाडी चालवितो, त्याचप्रमाणे त्याच वेगात तो रिव्हर्स गाडीही तशीच वेगाने चालवू शकतो़.  विशेष म्हणजे तो एका गुन्ह्यात वापरलेली गाडी पुन्हा लगेचच दुसऱ्या गुन्ह्यासाठी कधी वापरत नाही़.  गुन्ह्यात वापरलेली गाडी तो नंतर सोडून देतो़. 

तुरुंगात ओळख
पैतरसिंग हा बाल गुन्हेगार म्हणून रिमांड होममध्येही होता़, पण तरीही तो सुधारला नाही़, घरातील सर्वच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने तोही त्यांच्यात ओढला गेला़. तुरुंगात असताना त्याची निशांत आणि ऋषिकेश यांच्याशी ओळख झाली़ बाहेर पडल्यावर ते एकत्र घरफोड्या करु लागले़ . 

रेकी करुन करीत असे घरफोडी
पैतरसिंग व त्याचे साथीदार अगोदर जेथे सुरक्षा रक्षक नाही, अशा मध्यम स्वरुपाच्या सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करीत बंद असलेली घरे हेरत आणि त्यानंतर कारमधून त्या सोसायटीत जात़.  कारमधून आल्याने त्यांच्याविषयी कोणाला संशय येत नसे़.  घरफोडी, जबरी चोरी असे गुन्हे करताना तो नेहमी त्याचे साथीदार बदलत असे़, त्यामुळे तो गेली दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देऊ शकला.

Web Title: Age 19 year old boy with registered offenses two hundred three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.