वयाच्या 82 व्या वर्षीही ते तयार करतात टाकावू पासून टिकावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 07:23 PM2018-06-05T19:23:14+5:302018-06-05T19:23:14+5:30

घरातील अनेक वस्तू जुन्या झाल्या म्हणून टाकून दिल्या जातात. परंतु पुण्यातील 82 वर्षीय नानासाहेब वाघ याच टाकावू वस्तूंपासून अाकर्षक अशा शाेभेच्या वस्तू तयार करीत अाहेत.

at the age of 82 they make waste to best | वयाच्या 82 व्या वर्षीही ते तयार करतात टाकावू पासून टिकावू

वयाच्या 82 व्या वर्षीही ते तयार करतात टाकावू पासून टिकावू

Next

राहुल गायकवाड 
पुणे : घरातील अनेक वस्तू जुन्या झाल्या की त्या कचऱ्यात टाकून दिल्या जातात. त्यातच काचेच्या वस्तू फुटल्या तर त्यांचा उपयाेग हाेत नाही. परंतु पुण्यातील नानासाहेब वाघ हे गेली 55 वर्षे टाकावू वस्तूंपासून अाकर्षक अश्या शाेभेच्या वस्तू तयार करीत अाहेत. वयाच्या 82 व्या वर्षी सुद्धा त्यांचा उत्साह तरुणांपेक्षा अधिक अाहे. वयाेमानानुसार एेकू कमी येत असलं तरी त्यांनी अापली कला जाेपासली अाहे. अापली ही टाकावू पासून शाेभेच्या वस्तू तयार करण्याची कला पुढच्या पिढीपर्यंत पाेहचविण्याचा प्रयत्न ते अाता करीत अाहेत. 


    नानासाहेब वाघ हे तुटलेल्या काचेच्या बांगड्यांपासून विविध अाकर्षक शाेभेच्या वस्तू तयार करतात. पक्षी, प्राणी अशी अनेक चित्रे ते तुटलेल्या बांगडीच्या अाधारे तयार करतात. सुरुवातील ते या वस्तू तयार करण्यासाठी विशिष्ट राॅडचा वापर करत असे. ताे राॅड पुण्यात मिळत नसल्याने ताे बाहेरुन मागवने अवघड जात असे. त्यातून मार्ग काढत त्यांनी बांगड्यांच्या अाधारे  वस्तू तयार करण्यात सुरुवात केली. अभिनव कला महाविद्यालयातून त्यांनी अपाले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शेतकी महाविद्यालयातून या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. पुढे नाेकरीमुळे त्यांना अापली कला जाेपासता अाली नाही. परंतु कलेची वाट त्यांनी कधीच साेडली नाही. गेल्या 55 वर्षांपासून ते या काचेच्या शाेभेच्या वस्तू तयार करीत अाहेत. पूर्वी ते अाठ-अाठ तास या वस्तू तयार करण्यासाठी घालवत असत. या वस्तू गॅसवर तापवून त्यांना विविध अाकार दिले जातात. सुरुवातील लाेहाराच्या भात्यावर तसेच राॅकेलच्या दिव्यावर ते या वस्तू तयार करत असत. नंतर छाेट्या गॅसच्या सहाय्याने त्यांनी या वस्तू तयार करण्यास सुरुवात केली. 


    वयाच्या 82 व्या वर्षीही नानासाहेब वाघ चार चार तास बसून या वस्तू तयार करतात. यासाठी अपार मेहनत अाणि इच्छा गरजेची असल्याचे त्यांचे म्हणणे अाहे. या वस्तूंना माेठी मागणी असल्याने तरुणांसाठी एक उत्पन्नाचं एक वेगळं साधन यातून निर्माण झाले अाहे. नानासाहेब ही कला तरुणांना शिकविण्यास सुद्धा तयार अाहेत. ही कला लाेप न पावता पुढच्या पिढीने अात्मसात करायला हवी अशी त्यांची इच्छा अाहे. त्यासाठी या वयातही राेज चार-पास तास ते शिकविण्यासाठी तयार अाहेत. एका कलेतून तसेच घरातील टाकावू वस्तूंपासून एक राेजगाराची संधी निर्माण हाेऊ शकते असाच काहीसा संदेश नानासाहेब या कलेतून तरुणांना देत अाहेत. शेवटी कला टिकली पाहिजे अशीच नानासाहेबांची इच्छा अाहे. 

Web Title: at the age of 82 they make waste to best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.