मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अन्यायाबाबत धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:14+5:302021-09-09T04:15:14+5:30
पुणे : दौंड तालुका कला, वाणिज्य महाविद्यालय दौंड या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलांची लाखो रुपये शिष्यवृत्तीचे वाटपच ...
पुणे : दौंड तालुका कला, वाणिज्य महाविद्यालय दौंड या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलांची लाखो रुपये शिष्यवृत्तीचे वाटपच केले नाही. आदिवासी मुलांचे शिष्यवृत्तीचे अर्ज हे वरती पाठवण्याऐवजी ते अर्ज परस्पर गायब केले आहेत. त्यामुळे अशा प्राचार्यांवर कायदेशीर कारवाई करावी. या मागणीसाठी बहुजन लोक अभियानच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
बहुजन लोक अभियानचे प्रदेशाध्यक्ष आबा वाघमारे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे उपोषण करून याप्रकरणी न्याय मिळण्याची मागणी केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त यांना देण्यात आले. तसेच याबाबत दोषींवर कारवाई करावी म्हणून पुणे विद्यापीठातही आंदोलन केले होते. त्यानंतर शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोरही आंदोलन केले आहे; परंतु अद्याप कारवाई झाली नाही.