बाजार समितीतल्या पथारी व्यावसायिकांघे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:09 AM2020-12-09T04:09:22+5:302020-12-09T04:09:22+5:30
पुणे: बाजार समिती प्रशासनाने अचानक भाडे वाढवल्याने पथारी व्यावसायिक पंचायतने समितीच्या आवारात सोमवारपासून सुरू केलेले आंदोलन मंगळवारी स्थगित केले. ...
पुणे: बाजार समिती प्रशासनाने अचानक भाडे वाढवल्याने पथारी व्यावसायिक पंचायतने समितीच्या आवारात सोमवारपासून सुरू केलेले आंदोलन मंगळवारी स्थगित केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने हा निर्णय घेण्यात आला.
बाजार समिती प्रशासनाने त्यांच्या आवारात अनेक वर्षांपासून व्यवसाय करत असलेल्या ५२ गाळेधारकांचे भाडे अचानक दररोज ५०० रूपये व जीएसटीचे ९० रूपये असे केले. हे भाडे मान्य करत नाही तोपर्यंत आवारात व्यवसाय करण्यास मनाई केली होती.
त्याविरोधात पथारी व्यावसायिक पंचायतच्या वतीने सोमवारी सकाळपासून बाजार समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. पंचायतीचे अधअयक्ष बाळासाहेब मोरे तसेच विक्रेते इक्बाल अळंद, मोहन चिंचकर, जब्बार शेख, नीलम अय्यर, दादाभाई नलावडे, शिवचरण गायकवाड, फिरोज बागवान, राजेंद्र पिसाळ आंदोलनात सहभागी झाले होते.
बाजार समिती प्रशासनाच्या या भूमिकेच्या विरोधात पंचायत समितीने केलेल्या आंदोलनाची माहिती मिळाल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ११) याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी उपोषण स्थगित केल्याचे मोरे म्हणाले.