राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:45+5:302021-06-04T04:08:45+5:30
पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेल्या मनमानी धोरणांविरोधात, गुरुवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका भवनाच्या पायऱ्यांवर बसून ...
पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेल्या मनमानी धोरणांविरोधात, गुरुवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्यात आले.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या आंदोलनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पुणेकरांची गैरसोय करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगितले़ १५ मेनंतर कोणत्याही प्रकारे खोदाईची कामे न करता १५ ते ३१ मेदरम्यान माॅन्सूनपूर्व कामांची दुरुस्ती करून शहराला पावसाळ्याला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवले जाते़ परंतु, पुढील वर्षी महापालिकेची निवडणूक होणार असल्याने, या निवडणुकीवर डोळा ठेवून सत्ताधाऱ्यांकडून या निकषांना हरताळ फासला जात आहे. केवळ आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी शहरात आजही तीनशे ते चारशे कोटी रुपयांच्या कामांच्या माध्यमातून लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता अशा विविध रस्त्यांवर खोदकाम केले जात आहे. अनधिकृत केबल खोदाईसाठी परवानगी दिली जात आहे. या सर्व बाबी आक्षेपार्ह असून, त्यामुळे पुणेकर नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला़