रंगकर्मींवर उपासमारीची वेळ; राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 02:00 PM2021-08-08T14:00:28+5:302021-08-08T14:05:54+5:30

जनसामान्यांना मनोरंजनातून निखळ आनंद देणाऱ्या या कलाकारांकडे सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

An agitation in front of the District Collector's Office in Pune tomorrow to draw the attention of the state government | रंगकर्मींवर उपासमारीची वेळ; राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या आंदोलन

रंगकर्मींवर उपासमारीची वेळ; राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या आंदोलन

Next
ठळक मुद्देगेल्या दीड वर्षांपासून विविध क्षेत्रातील रंगकर्मींचे प्रचंड हाल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन एकाच वेळीस होणार

पुणे : कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून विविध क्षेत्रातील रंगकर्मींचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जनसामान्यांना मनोरंजनातून निखळ आनंद देणाऱ्या या कलाकारांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांना जागे करण्यासाठी रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र यांनी सोमवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता आंदोलन करणार आहेत. 

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन एकाच वेळीस होणार असल्याचे संस्थेच्या वृंदा साठे यांनी सांगितले आहे. कलाकारांच्या सर्व मागण्या सरकार समोर ठेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत. असेही त्या म्हणाल्या आहेत. 

सिनेमा, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकारांबरोबरच तमाशा, भजन, कीर्तन, गोंधळ, पोवाडा, लावणी, लोककला सादर करणाऱ्या रंगकर्मींचाही या आंदोलनात सहभाग असणार आहे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठीच्या मागण्या या आंदोलनातून सरकारपुढे मांडण्यात येणार आहेत. 

आंदोलनातील त्वरित मागण्या 

- एक, दोन किंवा अतिशय कमी कलाकारांना घेऊन जे लोक कलावंत आपली कला दाखवून गुजराण करतात. त्यांना आपली कला सर्वत्र सादर करण्याची व त्यासाठी प्रवासाची परवानगी मिळावी. 
- चित्रीकरण, थिएटर व सांस्कृतिक कार्यक्रम त्वरित पूर्ववत सुरु करावेत. 
- शासनाने कलाकारांच्या मुलांना शाळेत विना फी प्रवेश द्यावा 
- महाराष्ट्रातील कलाकारांना रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी
- कोरोना काळात परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत शासनाने प्रत्येक कलाकारास दरमहा ५ हजार रुपये द्यावेत 
- मराठी चित्रपटांना त्वरित अनुदान मिळावे   

Web Title: An agitation in front of the District Collector's Office in Pune tomorrow to draw the attention of the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.