प्राध्यापकांचे ६० दिवसांनंतर आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:16 AM2021-09-17T04:16:24+5:302021-09-17T04:16:24+5:30
राज्यात पूर्णवेळ प्राध्यापक भरती तत्काळ सुरू करावी, तासिकात्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी करावी, तासिका तत्त्वावरील सीएचबी प्राध्यापकांचा कामाचा अनुभव ...
राज्यात पूर्णवेळ प्राध्यापक भरती तत्काळ सुरू करावी, तासिकात्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी करावी, तासिका तत्त्वावरील सीएचबी प्राध्यापकांचा कामाचा अनुभव नियुक्तीपासून ग्राह्य धरावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेतर्फे मध्यवर्ती इमारतीसमोर साठ दिवसांपासून आंदोलन सुरू होते. या मागण्यांबाबत ७ सप्टेंबर रोजी उदय सामंत यांच्याशी बैठक झाली. तसेच शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर यांनी गुरुवारी आंदोलन प्राध्यापकांची भेट घेतली. अहिर यांनी या प्राध्यापकांचे सामंत यांच्याशी बोलणे करून दिले. सामंत यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. तसेच याबाबतचे निवेदन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांना देण्यात आले. या वेळी युवासेनेचे राज्य सहसचिव किरण साळी, कल्पेश यादव आदी उपस्थित होते.
-------------