आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन, हे सरकार सपशेल फेल सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:20+5:302021-06-27T04:08:20+5:30
ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शनिवारी भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. त्यातच नसरापूरमध्ये भाजपने चक्काजाम ...
ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शनिवारी भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी चक्का
जाम आंदोलन पुकारले आहे. त्यातच नसरापूरमध्ये भाजपने चक्काजाम आंदोलन करून राज्य सरकारने रद्द केलेल्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचा जाहीर निषेध केला. यावेळी भाजप असंख्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
ओबीसी आरक्षण महाराष्ट्र सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ भोर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षणासाठी आज नसरापूर येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार शरद ढमाले,भगवान पासलकर ,जीवन कोंडे, डॉ. शाम दलाल,अशोक पांगारें, विश्वास ननावरे,अमर बुदगुडे, विनोद चौधरी,ॲड. कपिल दुसंगे,सुनील पांगारे, सुनील मालुसरे,निलेश कोंडे, संतोष लोहोकरे, डाॅ. पुष्कर दलाल,राजु गुरव,अभिजीत कोंडे, शिवाजी देशमुख, किशोर धुमाळ, प्रमोद ढम,किरण दानवले, सागर पोळेकर, आकश जाधव,सुनील जागडे,नाना साबणे,दीपाली शेटे, स्वाती गांधी, सुरज मरळ, रोहन कोंडे, अमोल मालुसरे, व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राजगड पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर कार्यकर्त्यांना सोडण्यात आले.