मास्क न लावता आंदोलन करणे पडले महागात; ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 11:27 AM2020-08-25T11:27:44+5:302020-08-25T11:28:52+5:30

कचऱ्याचे कंटेनर गणेश विसर्जनासाठी दिल्यामुळे भावना दुखाविल्याचे कारण देत आंदोलन

Agitation without wearing a mask; Filed a case against the office bearers of Brahmin Federation | मास्क न लावता आंदोलन करणे पडले महागात; ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

मास्क न लावता आंदोलन करणे पडले महागात; ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजीनगर पोलिसांनी केला त्यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल

पुणे : गणेश विसर्जनासाठी कचर्‍याचे कंटेनर पाठवून हिंदु धर्मातील गणेश भक्तांच्या भावना दुखाविल्याच्या कारणावरुन मास्क न लावता आंदोलन करणे ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांना चांगलेच महागात पडले. फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याने त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद कन्हैयालाल दवे (वय ४७, रा. गुरुवार पेठ), निलेश श्रीकांत जोशी (वय ३९, रा. आनंदनगर, वडगाव), मनोज सदाशिव तारे (वय ४४, रा. कळस), तुषार नंदकुमार निंबर्गी (वय २८, रा. शिवणे), सौरभ मनोहर वैद्य (वय २६, रा. मांजरी), दिलीप सुरेश तांबेकर (वय ५२, रा़ कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
महापालिकेने नवीन कंटेनरमध्ये गणेश विसर्जनाची सोय केली आहे. मात्र, हे कचर्‍याचे कंटेनर असून त्यामुळे आमच्या भावना दुखाविल्याचा दावा करत ब्राह्मण महासंघाच्या या पदाधिकार्‍यांनी सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन केले. त्यात त्यांनी महापालिकेचे प्लॅस्टिकचे फोटो असलेला फलक पाण्याच्या बादलीत बुडविला. पुणे महानगर पालिका निषेध असो अशा घोषणा दिल्या.
हे आंदोलन करताना त्यांनी पूर्व परवानगी घेतली नाही. सह पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग करुन तोंडाला मास्क न लावता कोवीड १९ साथ रोगाचा संसर्ग होईल, असे घातकी कृत्य करुन आंदोलन केले. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला. त्या सर्वांना पोलिसांनी फरासखाना येथे घेऊन गेले. त्यानंतर त्यांची नोंद करुन घेऊन सर्वांची जामिनावर सुटका केली आहे.

Web Title: Agitation without wearing a mask; Filed a case against the office bearers of Brahmin Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.