आंदोलने, निदर्शनाने भारत बंदला पाठींबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:09 AM2020-12-09T04:09:51+5:302020-12-09T04:09:51+5:30

पुणे : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भारत बंद मध्ये सहभागी होत ठीकठीकाणी केंद्र शासनाविरोधात निदर्शने ...

Agitations, demonstrations support Bharat Bandla | आंदोलने, निदर्शनाने भारत बंदला पाठींबा

आंदोलने, निदर्शनाने भारत बंदला पाठींबा

Next

पुणे : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत जिल्ह्यातील

शेतकऱ्यांनी भारत बंद मध्ये सहभागी होत ठीकठीकाणी केंद्र शासनाविरोधात निदर्शने केली. जिल्ह्यातील अनेक महत्वाचे बाजार आंदोलनामुळे बंद राहिले. आंदोलनात जिवनावश्यक दुकाने सुरू राहिल्याने नागरिकांची गैरसोय टळली.

केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या अंदोलनाला पाठींबा देण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. याला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. चाकण येथील बाजार बंद ठेवत शेतकऱ्यांनी केंद्र शासनाविरोधात आंदोलन केले. आळेफाटा, इंदापुर, बारामती, मंचर, जेजुरी, सासवड, राजुरी, उरूळी कांचन, दौंड, केडगाव या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निषेध आंदोलने करण्यात आले. तसेच अन्यायकारक कृषी कायदा रद्द करण्याची मागणी या वेळी आंदोलकांनी केली. बहूतांश बाजार बंद हाेते. मात्र, जिवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती.

जिल्ह्यात चाकण, बारामती, इंदापुर, नारायणगाव, आळेफाटा, ओतूर, दौंड, इंदापुर येथे महत्वाच्या बाजारपेठा आहेत. या सर्व बाजार पेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मंचर, घोडेगाव येथे आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी उत्फूर्तपणे बंद ठेवला. तर काही ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Web Title: Agitations, demonstrations support Bharat Bandla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.