हॉटस्पॉट गावातील व्यावसायिक विक्रेत्यांची ॲजीटन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:17+5:302021-03-21T04:11:17+5:30
राजगुरुनगर: खेड तालुक्यातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी चाकण औद्योगिक परिसरातील हाँटस्पाँट ठरलेल्या १६ गावातील सुपर स्प्रेडर ठरलेले ...
राजगुरुनगर: खेड तालुक्यातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी चाकण औद्योगिक परिसरातील हाँटस्पाँट ठरलेल्या १६ गावातील सुपर स्प्रेडर ठरलेले सर्व व्यवसायिक,विक्रेते अशा सर्वाची अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली. ७०२ व्यावसायिकांच्या तपासणीतून ४२ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यातील ३८ रुग्णाना म्हाळुंगे कोविड सेंटर तर ४ रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दिली.
चाकण औद्योगिक पट्यातील १६ गावांतील सर्व लोकसंपर्क असणा-या व्यावसायिक आस्थापनाच्या मालकांसह,कामगार आणि कुंटुबांची अँटीजेन टेस्ट करण्यासाठी स्थानिक प्रशासन, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदी मिळून आरोग्य तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. या गावांवर स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आले आहे. गेल्या दोन-तीन दिवसात केलेल्या तपासणीत निघोजे येथे ११८ पैकी ३ , नाणेकरवाडी येथे ११७ पैकी १४, मेदनकरवाडी १५२ पैकी १० च-होली खुर्द मध्ये १६५ पैकी १, चाकण नगरपरीषद हद्दीत ४९ पैकी १, आणि आळंदी नगरपरीषद हद्दीत १०१ पैकी १३ करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड पोलिसांनी राजगुरूनगर शहरात विनामास्क दुचाकीस्वार, तसेच चारचाकीत बसलेल्या विनामास्क प्रवाशावर व नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलून दंड वसुल केला जात आहे. पोलिसांनी रात्रीच्या संचारबंदी काळात ९ हॉटेल व्यावसियाकांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहे. तसेच दुकानदार, कापड व्यवसायिक यांनाही पोलिसांनी दुकांनात गर्दी होऊ देऊ नये. अन्यथा गुन्हे दाखल होतील असे बजाविण्यात आले असल्याचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव यांनी सांगितले.
२० राजगुरुनगर कारवाई
राजगुरुनगर शहरात विनामास्क फिरणाऱ्या वर पोलिस दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे..