अग्निहोत्र पथकाने सर केला लिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:27+5:302020-12-24T04:11:27+5:30
या किल्ल्याकडे जाताना कड्यावरील अवघड बोराट्याची घळ पार करुन किल्याच्या पायथ्याशी जावे लागते व तेथुन दोरांच्या सहाय्याने किल्ला सर ...
या किल्ल्याकडे जाताना कड्यावरील अवघड बोराट्याची घळ पार करुन किल्याच्या पायथ्याशी जावे लागते व तेथुन दोरांच्या सहाय्याने किल्ला सर करावा लागतो. लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे.लिंगाणासह माणगड,सोनगड,महिंद्रगड,कोकणदिवा हे किल्ले रायगडकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहाऱ्यासाठी वापरले जायचे. रायलिंग पठारा वरुन बोराट्याच्या नाळे मधुन खाली उतरुन गेल्यावर आकाशात उंच गेलेला शिवलिंगा सारखा सुळका असलेला लिंगाणा किल्ला महाडपासुन इशान्येस सोळा मैलावर असुन सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगडच्या दरम्यान आहे. किल्ल्याची पायथ्या पासुन उंची एक हजार फुट आहे किल्ल्याची तटबंदी आता पुर्ण नष्ट झालेली आहे चढताना मध्येच एक पाण्याचे एक टाके, एक मानव निर्मित गुहा कड्यात आढळते. किल्ल्याच्या शिखरावर फारच थोडी जागा असुन त्या ठिकाणी स्वराज्याचा भगवा सतत फडकत आहे.किल्ल्याच्या चढणी प्रमाणे उतरण अवघड आहे दोरीच्या सहाय्यानेच उंच कडे उतरता येऊ शकतात हे किल्ल्यावर गेल्यावरच समजते.
लिंगाणा किल्ला सर केल्यानंतर रायलिंग पठारावर उभे असलेले पथक.
२३ नसरापूर