प्रवासी वाहतुकीसाठी महामेट्रो-आपमध्ये करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:35+5:302021-06-27T04:08:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मेट्रो स्थानकापासून प्रवाशांची ने-आण करण्यासाठी महामेट्रो व आप रिक्षा संघटना यांच्यात करार झाला. ‘फर्स्ट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मेट्रो स्थानकापासून प्रवाशांची ने-आण करण्यासाठी महामेट्रो व आप रिक्षा संघटना यांच्यात करार झाला. ‘फर्स्ट माईल लास्ट माईल’ अशी ही सुविधा असून मेट्रो स्थानकापासून १ किलोमीटरच्या परिघात याचा उपयोग होईल.
रिक्षाच्या मीटरप्रमाणे ग्राहकाला प्रवास भाडे द्यावे लागणार आहे. महामेट्रो कंपनीने विकसित केलेले एक ॲप्लीकेशन रिक्षा संघटनेला विनामूल्य मिळणार आहे. ‘आप’च्या मोबाईल ॲपला हे संलग्न केले जाणार असून त्यासाठी रिक्षा चालकाला दिवसभरात १० रूपये खर्च येईल. रिक्षात बसल्यावर ॲपद्वारे प्रवाशाला मेट्रोचे तिकीट काढता येणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांसाठी हा करार आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी चिंचवड ते दापोडी हे दोन मार्ग प्राधान्याने सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गांवर मेट्रोची ११ स्थानके असतील. महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी घाडगे, मनोजकुमार तसेच आम आदमी पार्टीचे संघटक विजय, श्रीकांत आचार्य, किशोर मुजुमदार, संघटनेचे अध्यक्ष अजगर बेग तसेच गणेश ढमाले, आनंद अंकुश, केदार ढमाले, सागर सोनवणे, राघवेंद्र राव करार करताना उपस्थित होते.