Pune Crime : बनावट सहीद्वारे केले ॲग्रीमेंट; दाम्पत्याने मागितली पाच कोटींची खंडणी 

By नारायण बडगुजर | Published: November 5, 2022 04:31 PM2022-11-05T16:31:14+5:302022-11-05T16:31:31+5:30

दाम्पत्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल....

Agreement made by forged signature couple demanded a ransom of five crores | Pune Crime : बनावट सहीद्वारे केले ॲग्रीमेंट; दाम्पत्याने मागितली पाच कोटींची खंडणी 

Pune Crime : बनावट सहीद्वारे केले ॲग्रीमेंट; दाम्पत्याने मागितली पाच कोटींची खंडणी 

googlenewsNext

पिंपरी : बनावट सही करून केलेले ॲग्रीमेंट रद्द करण्यासाठी महिलेकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी दाम्पत्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. इंद्रायणीनगर, भोसरी येथे मार्च २०२१ ते ४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.

याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संतोष भीमराव पारवे पाटील (वय ४२, रा. दापोडी) आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फसवणूक व पैसे उकळण्याच्या उद्देशाने ते स्वतः डॉक्टर असल्याचा बनाव केला. त्यांचे नोंदणीकृत हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट असल्याची खोटी माहिती के. एल. ई. युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट या संस्थेला दिली. संस्थेचा विश्वास संपादन करून संस्थेसोबत ॲग्रीमेंट केले.

आरोपींनी फसवणुकीच्या इराद्याने सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट बनवून त्यावर फिर्यादी, संस्थेचे रजिस्ट्रार व्ही. ए. कोटीवाले आणि डॉ. व्ही. डी. पाटील यांची बनावट सही करून फिर्यादी यांच्या संस्थेची फसवणूक केली. बनावट सहीद्वारे केलेले ॲग्रीमेंट रद्द करण्यासाठी आरोपींनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Agreement made by forged signature couple demanded a ransom of five crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.