नारायणगाव येथे कृषिदूतांची शेतीविषयक प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:15 AM2021-08-21T04:15:26+5:302021-08-21T04:15:26+5:30

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषिदूत तेजस ज्ञानेश्वर खराडे ...

Agricultural demonstrations of agricultural envoys at Narayangaon | नारायणगाव येथे कृषिदूतांची शेतीविषयक प्रात्यक्षिके

नारायणगाव येथे कृषिदूतांची शेतीविषयक प्रात्यक्षिके

googlenewsNext

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषिदूत तेजस ज्ञानेश्वर खराडे याने शेतकऱ्यांना माहिती देत मार्गदर्शन केले. कोरोना परिस्थितीवर मात करीत कृषिदूत ग्रामीण कृषी जागरुकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम सादर करीत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम ऑनलाईन व घर टू घर अशा वेगळ्या पद्धतीने राबविण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांचा शेतीविषयक अनुभव जाणून घेऊन त्यांना आधुनिक व शास्त्रीय शेतीची माहिती देण्यात आली.

माती परीक्षणाचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, पिकांवर आवश्यक असणारी सेंद्रिय खते, औषधे यांचा योग्य वापर कसा करावा आदी विषयांवर यावेळी चर्चासत्र व प्रात्यक्षिके घेण्यात आली तसेच महिलांनी घरच्या घरी खाद्यपदार्थ तयार करून त्याची साठवणूक कशी करावी व तसेच त्याचे जीवनमान जास्त प्रमाणात कसे वाढवावे, याबाबत सविस्तर माहिती देऊन सखोल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ यू. बी. होले, केंद्रप्रमुख डॉ. आर. एच. शिंदे, समन्वयक डॉ बी. टी.कोलगणे, कार्यक्रम अधिकारी डॉ एम. एस. मोठे इत्यादीचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास सदाशिव खंडू तांबे, आशा तांबे, मारुती विधाटे, अर्चना विधाटे,शशिकांत कोल्हे, कृष्णा खराडे, खंडू विधाटे, मंगल विधाटे आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Agricultural demonstrations of agricultural envoys at Narayangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.