निमगाव केतकीतील खत दुकानावर कृृषी अधिकाऱ्याचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:37+5:302021-07-01T04:09:37+5:30
गजकुमार हिराचंद गांधी कृृृषी भंडार निमगाव केतकी, असे कारवाई करण्यात आलेल्या खत दुकानाचे नाव आहे.तर प्रवीण एकनाथराव बारवकर ( ...
गजकुमार हिराचंद गांधी कृृृषी भंडार निमगाव केतकी, असे कारवाई करण्यात आलेल्या खत दुकानाचे नाव आहे.तर प्रवीण एकनाथराव बारवकर ( रा.काटी, ता.इंदापूर,जि.पुणे) यांनी संबंधित दुकानदार यांचे विरुद्ध इंदापूर तहसीलदार व तालुका कृृृृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
दुकानात अतिरिक्त खतसाठा आढळून आला. १२ लाख ५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह संबंधित खत दुकान २१ दिवसांसाठी सील करण्यात आल्याची माहिती तालुका कृृषी अधिकारी यांनी केली आहे.
इंदापूर तालुक्यातील खत दुकानदार गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक व अडवणूक करून जादा पैसे घेत आहेत. संबंधित दुकानांबाबत तक्रारी दाखल झाल्यास दुकानदारांची लायसन्स रद्द करून कडक कारवाई करणार असल्याची माहिती इंदापूर तालुका कृृृृषी अधिकारी भाऊ साहेबराव रूपनवर यांनी दिली.
निमगाव केतकी येथील कारवाई करण्यात आलेले खत दुकान.