हरभरा पीक प्रात्यक्षिक प्लॉटला कृषी अधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:11 AM2021-02-11T04:11:17+5:302021-02-11T04:11:17+5:30
कृषी विभागामार्फत रब्बी हंगामात मौजे-चांदे येथील प्रगतशील शेतकरी प्रमोद मांडेकर यांच्या भात पड क्षेत्रामध्ये हरभरा प्रकल्प अंतर्गत पीक प्रात्यक्षिक ...
कृषी विभागामार्फत रब्बी हंगामात मौजे-चांदे येथील प्रगतशील शेतकरी प्रमोद मांडेकर यांच्या भात पड क्षेत्रामध्ये हरभरा प्रकल्प अंतर्गत पीक प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी केली. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली लागवड केलेल्या हरभरा पिकाची वाढ पाहून तालुका कृषी अधिकारी के. एम. हसरमनी यांनी समाधान व्यक्त करत प्रमोद मांडेकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
अवघे दहावीपर्यंतचे शिक्षण झालेल्या प्रमोद मांडेकर यांनी लॉन शेतीच्या माध्यमाने चांदे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना प्रगतशील शेतीचा मार्ग दाखवून आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. त्यांच्याच शेतात लॉन शेतीबरोबरच विविध पीक प्रात्यक्षिके घेतली जातात.
मागील खरीप हंगामात आंबेमोहोर पिकाचे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर रब्बी हंगामासाठी हरभरा पिकाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे.
या भेटीच्या प्रसंगी कृषी अधिकारी एन. बी. झंजे, आर. एम. डोंगरे, एन. जे. देवकर, पोलीस पाटील हनुमंत मांडेकर, मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर उपस्थित होते.
१० पौंड
प्रात्यक्षिक म्हणून लागवड करण्यात आलेल्या हरभरा पिकाची पाहणी करताना कृषी अधिकारी.