अहिल्यादेवी सर्वांत कुशल प्रसारक ठरल्या : दत्तात्रय घोगरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:56+5:302021-06-01T04:08:56+5:30
इंदापूर तालुक्यातील मौजे निरनिमगाव येथील अनंतराव पवार विद्यालयाच्या प्रांगणात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय ...
इंदापूर तालुक्यातील मौजे निरनिमगाव येथील अनंतराव पवार विद्यालयाच्या प्रांगणात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांच्या हस्ते करून सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे बोलत होते.
घोगरे म्हणाले की, लोककला जपली पाहिजे या उद्देशाने कलावंतांना राजाश्रय दिला. त्यामुळे राजमाता अहिल्यादेवी या महान राज्यकर्त्या होत्या. त्यांचे विचार अंधश्रद्धेवर प्रहार करणारे कायम होते. महिला सक्षमीकरणासाठी योगदान देणाऱ्या राजमाता एकमेव ठरल्या आहेत. त्यांच्या कार्याचे स्मरण युवकांनी व समाजातील प्रत्येक घटकाने सातत्याने आत्मसात करावे, असे आवाहन दत्तात्रय घोगरे यांनी केले.
या वेळी मुख्याध्यापक बाळासाहेब गरगडे यांनी त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यास, प्रत्येक वर्षी दहा हजार रक्कम व सन्मानपत्र देण्यात येणार असल्याचे घोषित केले. तर, संस्थेचे संस्थापक दत्तात्रय घोगरे यांच्या हस्ते मागील वर्षी यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष रणजित घोगरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब गरगडे, प्राध्यापक बाळासाहेब मोरे, अण्णासाहेब गोरे, संतोष जाधव, संतोष सावळकर, सतीश वनवे, ओम वनवे, विलास मरळे, राजू गोळे उपस्थित होते.
--
फोटो ३१इंदापूर अहिल्यादेवी होळकर
फोटो ओळ : इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथे राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेस अभिवादन करताना ग्रामस्थ