अहिल्यादेवी होळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:25+5:302021-06-01T04:08:25+5:30

माळेगाव: लोकाभिमुख राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन माजी सभापती संजय ...

Ahilya Devi Holkar | अहिल्यादेवी होळकर

अहिल्यादेवी होळकर

Next

माळेगाव: लोकाभिमुख राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन माजी सभापती संजय भोसले यांनी केले. दरम्यान, नगरपंचायत कर्मचारी व पत्रकारांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने नगरपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सभापती संजय भोसले यांनी केले. या वेळी माजी सदस्य भगवान गोंडे, रिपाईचे विश्वास भोसले,माथाडी संघटनेचे केशव भोसले,क्यामुद्दीन शेख,राजेंद्र देवकाते, संदीप आढाव, नेहाल भोसले आदी उपस्थित होते.

या वेळी माजी सभापती संजय भोसले यांच्या हस्ते नगरपंचायत कामगार शंकर ठोंबरे, राजू शेख, सुरेश सावंत,सागर दंडवते,कुंडलिक येळे,दिलीप जाधव,सेहवाग सोनवणे,रेश्मा शेख,माया कदम यांच्यासह पत्रकार विजय भोसले,सतीश गावडे,योगेश भोसले यांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते चंद्रकांत वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ गायकवाड,सुधीर वाघमोडे,सोनू वाघमोडे,ओंकार वाघमोडे,धनराज वाघमोडे,अतुल नरुटे,सचिन वाघमोडे,आबा वाघमोडे यांनी केले.

-------------------

नगरपंचायत कार्यालयात खरे तर प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील यांनी शासकीय आदेशानुसार पूजन करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासक फिरकलेच नसल्याने शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने चंद्रकांत वाघमोडे यांनी निषेध व्यक्त केला.

-------------------------

नगरपंचायत कार्यालयात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली.

३१०५२०२१-बारामती-०३

Web Title: Ahilya Devi Holkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.