विविध क्षेत्रांतील व्यक्तींना अहिल्यारत्न पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:59 AM2018-06-20T00:59:38+5:302018-06-20T00:59:38+5:30
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे कलादालन येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळा समितीच्यावतीने विविध क्षेत्रांत उलेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
धनकवडी : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे कलादालन येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळा समितीच्यावतीने विविध क्षेत्रांत उलेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल धनकवडीमधील जाणीव सामाजिक संस्थेचे कार्यवाह प्रमोद पाटील यांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दादामहाराज नगरकर व नगरसेविका स्मिता वस्ते यांच्या हस्ते रोप, सन्मानचिन्ह, शाल व अहिल्याबार्इंच्या कार्याचा आढावा देणारे पुस्तक देऊन हा गौरव करण्यात आला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, डॉ. दत्ता कोहिनकर, दादा नगरकरमहाराज, आशा धायगुडे, रुपाली पाटील, व्याख्याते डॉ. यशपाल भिंगे, डॉ. अशोक शीलवंत, डॉ. अनिल दूधभाते, शाहीर शिवाजी थिटे, कन्यारत्न आणि ब्रह्मवाणी वाग्देवाची या मराठी चित्रपटातील प्रमुख कलाकारांच्या उपस्थित हा पुरस्कार वितरण सोहळा झाला.
अॅड. विजय गोफणे, सोमनाथ देवकाते, मनोज मारकड, संतोष शिंदे, गणेश सोनटक्के, पोपट यमगर, सागर पाटील, मनोज गवळी, तुषार वाघमारे, उमेश धनगर, संदीप कुरवर, योगेश लोणकर, अमोल काळे, शिवाजी मेळकुंदे, रमेश मरगळे, महादेव वलेकर, भीम देवकाते, दत्ता मरगळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.