अहमदनगर जिल्हा विभाजनावर रोहित पवार म्हणतात की... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 08:58 PM2020-02-11T20:58:40+5:302020-02-11T21:05:32+5:30

कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक आमदार रोहित पवार नवा प्रयोग राबवणार आहेत.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

On the Ahmednagar district division, Rohit Pawar says ... | अहमदनगर जिल्हा विभाजनावर रोहित पवार म्हणतात की... 

अहमदनगर जिल्हा विभाजनावर रोहित पवार म्हणतात की... 

googlenewsNext

पुणे : अहमदनगर जिल्हा विभाजनाचा विषय सुरु असताना कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे.एकाच बाजूला सुविधा जाऊ नयेत असे सांगताना त्यांनी मी विभाजनाच्या बाजूने आणि विरोधातही नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक आमदार रोहित पवार नवा प्रयोग राबवणार आहेत.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी त्यासाठी स्थापन केलेल्या 'कर्जत-जामखेड' फाउंडेशनच्या उदघाटनाला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते मिलिंद गुणाजी, लेखक अरविंद जगताप उपस्थितीत राहणार आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, पर्यटन यांच्यासोबत मतदारसंघात रोजगार वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे. 

यावेळी पवार म्हणाले की, 'हा अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे, अनेक जण याकडे भावनिक दृष्टीने बघतात. मात्र यावर सर्व परिस्थितीचा विचार करून निर्णय व्हायला हवा. माझा यावर तेवढा अभ्यास नाही हेही त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. 

नव्या प्रोजेक्टविषयी बोलताना ते म्हणाले की, 'माझ्या मतदारसंघात तुलनेने माहिती नसलेले अनेक पर्यटनस्थळं आहेत. त्यांची सर्व माहिती वेबसाईटवर उपलब्ध केली जाईल. नुसते पर्यटन नाही तर चित्रीकरणासाठीही हा उत्तम भाग आहे. शिवाय शिक्षण, रोजगार, आरोग्य अशा विविध कामांसाठी आर्थिक मदत स्वीकारली जाईल. मिलिंद गुणाजी यांच्यासोबत कर्जत जामखेडचे पर्यटनस्थळं दाखवणारी दहा भागांची वेबसिरीजही तयार केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच कामांचे औपचारिक उदघाटन येत्या शुक्रवारी हडपसर येथे केले जाणार आहे. 

Web Title: On the Ahmednagar district division, Rohit Pawar says ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.