पुणे विभागात अहमदनगर, सोलापूर अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:27+5:302021-07-17T04:09:27+5:30
पुणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. यामध्ये पुणे विभागात अहमदनगर ...
पुणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. यामध्ये पुणे विभागात अहमदनगर आणि सोलापूर जिल्हा अव्वल ठरले आहेत. अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याची टक्केवारी ९९.९७ एवढी आहे, तर पुणे जिल्ह्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. पुणे विभागात केवळ ९७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
पुणे विभागात एकूण २ लाख ६५ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ६५ हजार ८०१ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून २ लाख ६५ हजार ७०४ विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाची निकालाची एकूण टक्केवारी ९९.९६ आहे. त्यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.९७, तर मुलांचे ९९.९५ इतके आहे. तर पुनर्परीक्षार्थी अर्थात रिपीटर विद्यार्थ्यांचा पुणे विभागाचा निकाल ९१.८६ टक्के लागला आहे. तसेच प्रावीण्यासह प्रथम श्रेणी किंवा ७५ टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणारे १ लाख २ हजार ४७६ इतके विद्यार्थी आहेत. तर प्रथम श्रेणी किंवा ६० टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणारे १ लाख १६ हजार १७२ विद्यार्थी, तर दि्वतीय श्रेणी किंवा ४५ टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणारे ४४ हजार ९२८ विद्यार्थी असून उत्तीर्ण श्रेणी किंवा ३५ टक्क्यांच्या पुढे गुणे मिळवणारे २ हजार १२८ विद्यार्थी आहेत.
अहमदनगर जिल्ह्याचा निकाल :
अहमदनगर जिल्ह्यातील ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर निकालाची टक्केवारी ९९.९७ इतकी आहे. नगर जिल्ह्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १९ इतकी आहे. मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण ९९.९८, तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.९६ टक्के इतकी आहे.
सोलापू जिल्ह्याचा निकाल :
सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार १९६ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. त्यापैकी ६५ हजार १९३ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून ६५ हजार १७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालाची टक्केवारी ९९.९७ इतकी आहे. सोलापुरात अनुत्तीर्णाची संख्या १७ इतकी आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.९६, तर मुलींचे ९९.९८ टक्के इतकी आहे.
पुणे जिल्ह्याचा निकाल :
पुणे जिल्ह्यातील १ लाख ३० हजार २९ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ३० हजार २३ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून १ लाख २९ हजार ९६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालाची टक्केवारी ९९.९५ इतकी आहे. म्हणजेच पुण्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या फक्त ६१ एवढी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.९३ टक्के तर मुलींचे ९९.९७ टक्के आहे.