प्रेस स्टिकर लावून गांजाची वाहतूकअहअहमदनगरच्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:39 AM2020-11-22T09:39:42+5:302020-11-22T09:39:42+5:30
रवींद्र योसेफ आढाव (वय २३) आणि गाेरक्षनाथ लक्ष्मण दहातोंडे (वय ४१, दोघेही रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहमदनगर) अशी ...
रवींद्र योसेफ आढाव (वय २३) आणि गाेरक्षनाथ लक्ष्मण दहातोंडे (वय ४१, दोघेही रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस पथक गस्त घालत असताना सचिन जाधव यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी विमाननगर येथील कमिन्स इंडिया कंपनीच्या गेटजवळ सापळा रचला. त्यावेळी तेथे एक कार थांबलेली आढळून आली. त्यांच्या कारची पहाणी केल्यावर त्यात दोन पॉलिथीनच्या गोणीमध्ये ३७ किलो २००ग्रॅम गांजा आढळून आला. गांजाची वाहतूक करण्यासाठी ते वापरत असलेली कार पोलिसांनी पकडून नये व कोणी संशय घेऊ नये म्हणून त्यांनी कारचे पुढील बाजूच्या काचेवर इंग्रजीमध्ये प्रेस असे स्टिकर लावलेले होते. तसेच तालुका प्रतिनिधी निळा प्रहार स्पेशल फोरम तालुका अध्यक्ष असे स्टिकर लावलेले आढळून आले. पोलिसांनी दोघांकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात दारु विक्रीचा एक एक गुन्हा दाखल आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड, हनुमंत शिंदे, पोलीस अंमलदार सचिन जाधव, इम्रान शेख, प्रशांत गायकवाड, महेश बामगुडे, अय्याज दंड्डीकर, तुषा माळवदकर यांनी ही कामगिरी केली.