Pune Porsche Car Accident: पाेर्शे कार अपघात AI द्वारे उलगडणार; जर्मनीचे तंत्रज्ञ पुण्यात, घटना 'जिवंत' करणार
By नितीश गोवंडे | Published: May 29, 2024 05:43 PM2024-05-29T17:43:33+5:302024-05-29T17:44:03+5:30
अग्रवाल याच्या वकिलांनी न्यायालयात केलेला दावा खरा की खोटा? हे ठरवण्यास मदत हाेणार आहे....
pune porsche car accident पुणे : कल्याणीनगर येथील दुर्घटनेबाबत दररोज मोठमोठे खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत विविध गुन्हे दाखल झाले आहेत. यात बिल्डर विशाल अग्रवाल याच्या वकिलांनी न्यायालयात अपघातग्रस्त पोर्शे कारमध्ये तांत्रिक समस्या असल्याचा दावा केला होता. त्याची तक्रारही कंपनीकडे केल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिस एआयप्रणालीचा वापर करत या अपघाताची घटना जिवंत करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (pune porsche case check up by german company's technician)
दरम्यान, पोर्शे कंपनीची एक टीम मुंबईवरून पुण्यात दाखल झाली होती. या कारची तपासणी करण्यासाठी लवकरच जर्मनीवरूनही तंत्रज्ञ पुण्यात येणार आहेत. त्यामुळे अग्रवाल याच्या वकिलांनी न्यायालयात केलेला दावा खरा की खोटा? हे ठरवण्यास मदत हाेणार आहे.
'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार करणारे तावरे, हळनोर आणि घटकांबळे अखेर निलंबित
अपघातावेळी बिल्डरचे बाळ चालवत असलेल्या कारचा वेग किती होता, नेमका वेळ आणि किती वेळा कारला हार्ड ब्रेकिंग करण्यात आले, किती वेळा वेगाने कार चालवण्यात आली, याचा डेटा आरटीओला दिला जाणार आहे, तसेच कारमध्ये असलेल्या इनबील्ट डॅशकॅमचे रेकॉर्डिंग मिळवण्यात आले आहे. या सर्व माहितीचा वापर बिल्डरच्या बाळाविरोधात भक्कम पुराव्यांसाठी केला जाणार आहे.
Pune Porsche case: कोण आहेत डॉ. पल्लवी सापळे? SIT प्रमुखपदी वादग्रस्त अधिकाऱ्याची नियुक्ती
पुणे पोलिसांकडूनही या सगळ्या अपघाताची माहिती मिळवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यावरून पोलिस या प्रकरणात डिजिटल पुराव्यांवर भर देताना दिसत आहेत.