लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:07+5:302021-08-18T04:14:07+5:30
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुरेश गुगळे यांनी २०० साड्या, प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ३०० साड्या आणि ज्येष्ठ व्यावसायिक देविचंद कटारिया यांनी १५० ड्रेसची ...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुरेश गुगळे यांनी २०० साड्या, प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ३०० साड्या आणि ज्येष्ठ व्यावसायिक देविचंद कटारिया यांनी १५० ड्रेसची मदत केली. राम दळवी, पांडुरंग कोल्हे आदींनी यावेळी मदत दिली. कोविड काळात उल्लेखनीय कार्य केलेले व आरोग्यसेवेचा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. पिंकी कथे व पंजाब कथे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. लहू खैरे, डॉ. प्रशांत काचळे, डॉ. केतकी काचाळे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद ब्रम्हे होते. यावेळी सुनील भुजबळ, देविदास ताजवे, सुरेश वऱ्हाडी, सुभाष संकलेचा, सुनील श्रीवत, नरेंद्र खिवंसरा, संतोष जाधव, शशिकांत लोढा, विलास भन्साळी, मेहबूब काझी, संपत शिंदे, हर्षल मुथ्था, प्रशांत शहा, सूर्यकांत गांधी, स्वप्निल भन्साळी, सतीश कोल्हे, राजश्री बोरकर, पुष्पलता जाधव, ज्योती गांधी उपस्थित होते. प्रास्तविक अशोक गांधी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी केले तर प्रा. लहू गायकवाड यांनी आभार मानले.
फोटो : श्री लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी ५०० साड्या, १५० ड्रेसची मदत देण्यात आली.
170821\lokseva photo.jpg
- श्री लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी ५०० साड्या ,१५० ड्रेसची मदत देण्यात आली .