Ayli Ghiya: पुण्यातील आयली घिया ठरली ‘फिट इंडिया चॅम्पियन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 15:17 IST2022-08-28T14:37:45+5:302022-08-28T15:17:20+5:30
कलेच्या माध्यमातून विशेषत: नृत्याद्वारे शारीरिक, मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते, असेही आयली हिने सांगितले

Ayli Ghiya: पुण्यातील आयली घिया ठरली ‘फिट इंडिया चॅम्पियन’
पुणे : नृत्य, क्रीडा आणि अभिनय या त्रिसूत्रीचा अवलंब करून सुदृढ आरोग्यासाठी कार्यरत आहे. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात केंद्र सरकारच्या वतीने माझी ‘फिट इंडिया चॅम्पियन’साठी निवड झाली आहे. ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, अशी भावना युवा अभिनेत्री, नृत्यांगना आयली घिया हिने व्यक्त केली.
आरोग्यविषयक प्रश्नांवर करत असलेल्या जनजागृती विषयक कामाची दखल घेऊन स्पोर्टस् ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (साई) गेल्या वर्षी ‘फिट इंडिया ॲम्बेसेडर’ म्हणून निवड केली. चालू वर्षीही दखल घेतल्याने पुन्हा एकदा ॲम्बेसेडर बनण्याचा मान मिळाला आहे.
आई-वडील डॉक्टर असल्याने आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी घरातच वातावरण होते. समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने भविष्यकाळात विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्याचा मानस आहे. कलेच्या माध्यमातून विशेषत: नृत्याद्वारे शारीरिक, मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते, असेही आयली हिने सांगितले.