भोर-मांढरदेवी रस्त्याला हवा दुरुस्तीचा आधार

By Admin | Published: December 24, 2016 06:31 AM2016-12-24T06:31:07+5:302016-12-24T06:31:07+5:30

भोरवरून मांढरदेवीला जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती, साईडपट्ट्या भरून रस्त्यावरील अतिक्रमणे काढून खासगी गाड्यांचे थांबे बाजूला

Air correction basis on Bhor-Mandhrdevi road | भोर-मांढरदेवी रस्त्याला हवा दुरुस्तीचा आधार

भोर-मांढरदेवी रस्त्याला हवा दुरुस्तीचा आधार

googlenewsNext

भोर : भोरवरून मांढरदेवीला जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती, साईडपट्ट्या भरून रस्त्यावरील अतिक्रमणे काढून खासगी गाड्यांचे थांबे बाजूला करून रस्ता वाहतुकीस खुला करावा, पाणी शुद्धीकरण व जादा एसटी गाड्या सोडण्याच्या सूचना भोरच्या उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे यांनी केल्या.
मांढरदेवीची काळेश्वरी व कांजळे काळुबाईदेवीची ११, १२, १३ जानेवारीला होणाऱ्या यात्रेच्या तयारीसाठी येथील येथील तहसीलदार कार्यालयात प्रांत अधिकारी मौसमी बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली भोर तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी वरील सूचना बर्डे यांनी केल्या. या वेळी तहसीलदार वर्षा शिंगण, मुख्याधिकारी संजय केदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शंकर दराडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, आगारप्रमुख युवराज कदम, पशुधन अधिकारी डॉ. सचिन देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुदर्शन मलाजुरे, डॉ. राजेश मोरे, डॉ. धनंजय राऊत, कांचन बोडपाले, नायब तहसीलदार बाळासाहेब शिरसाट उपस्थित होते.
बर्डे म्हणाल्या, की भोर-मांढरदेवी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, साईडपट्ट्या भरून घ्यावे तसेच दिशादर्शक फलकांची दुरुस्ती करण्यात यावी. खासगी जीपगाड्यांचे थांबे बाजूला करून या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढून रस्ता वाहतुकीस खुला करावा. भोर आगाराकडून जादा एसटी गाड्या सोडाव्यात, मांढरदेवी रस्त्यावरील ११ गावांतील विहिरींचे पाणी शुद्धीकरण करून घेणे, आंबडखिंड घाटात विजेची सोय करणे, आरोग्य सुविधा २४ तास ठेवण्याच्या सूचना बर्डे यांनी दिल्या.

Web Title: Air correction basis on Bhor-Mandhrdevi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.