मुलांच्या विकासासाठी हवा प्रभावी संवाद आणि सक्रिय ऐकणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:09 AM2021-07-30T04:09:32+5:302021-07-30T04:09:32+5:30

माझ्या मुलीच्या ऑनलाइन वर्गातला थेट प्रसंग शेअर करण्यात मला आनंद होत आहे. जेव्हा एका बाईने, विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबतचे अनुभव ...

Air effective communication and active listening for children's development | मुलांच्या विकासासाठी हवा प्रभावी संवाद आणि सक्रिय ऐकणे

मुलांच्या विकासासाठी हवा प्रभावी संवाद आणि सक्रिय ऐकणे

Next

माझ्या मुलीच्या ऑनलाइन वर्गातला थेट प्रसंग शेअर करण्यात मला आनंद होत आहे. जेव्हा एका बाईने, विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबतचे अनुभव व्यक्त करायला सांगितले, तेव्हा अचानक एका चिमुरडीने उत्तर दिले की, ‘माझे दोन्ही पालक काम करतात. म्हणजे वर्किंग पेरेंट्स आहेत आणि त्यांच्याकडे माझे काहीही ऐकायला किंवा माझ्याशी खेळायला वेळच नाही. ते पूर्णतः व्यस्तच असतात.’ त्या चिमुकलीकडून हे शब्द ऐकणे खरोखरच करुणास्पद होते.

या प्रसंगाने मला बऱ्याच बाबींवर विचार करण्यास भाग पाडले आणि त्यातील मुख्य पैलू म्हणजे संवाद घालणे आणि सक्रियतेने ऐकणे. वास्तविक पाहता कोविड-१९ मुळे बऱ्याच काम करणाऱ्या पालकांसाठी वर्क फ्रॉम होम कॉन्सेप्ट उघडल्या गेल्या आणि त्यांना त्यांचे कार्यालयीन काम घरून व्यवस्थापित करावे लागते. पण, पालकांनो तुम्ही तुमच्या मुलांबरोबर किती वेळ घालवत आहात? मुलांसोबत किती तास तुम्ही घालवता हे महत्त्वाचे नसून, किती गुणात्मक तास तुम्ही घालवता, हे महत्त्वाचे आहे.

मुले त्यांच्या वाढत्या वयात खूपच संवेदनशील असतात आणि त्यांच्या भावनिक गरजा समजून घेणे ही प्रत्येक पालकांची जबाबदारी असते. सक्रियतेने ऐकणे, ऐकण्यापेक्षा वेगळे आहे. आपल्या मुलांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि भावनिक बंधन विकसित करण्यासाठी मी काही टिप्स शेअर करीत आहे. -

- सक्रियतेने ऐकताना तुम्ही तुमच्या मुलांवर पूर्ण लक्ष दिले पाहिजे.

- आपला सहानुभूतीशील दृष्टिकोन आपल्या मुलांसाठी सकारात्मक मजबुतीकरण म्हणून कार्य करते.

- सक्रिय संवाद स्थापन केल्यामुळे पालक आणि त्यांच्या मुलांमधील विश्वास निर्माण प्रक्रियेस प्रोत्साहन मिळते.

- पालकहो, तुमच्या मुलांशी असलेले तुमचे संबंध भविष्यात त्याचे / तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासावर सकारात्मक परिणाम करतील.

- आपल्या मुलांबरोबर संवाद साधताना नजरेचा संपर्क ठेवा.

- त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यात सामील व्हा किंवा त्यांना त्यांच्या आवडीच्या कार्यात व्यस्त ठेवा.

पालकांनो, आपल्या प्रिय बालकांच्या अधिक जवळ येण्यासाठी आणि त्यांना आनंदित करण्यासाठी हे लहानसे प्रयत्न खरोखरच आपल्यासाठी उपयुक्त ठरतील.

आशा आहे की आपण आपल्या चिमुरड्यांसोबत आता नेहमीच गुणात्मक वेळ घालवाल.

हॅप्पी पॅरेंटिंग !!!

डॉ. स्नेहल राज्यगुरू, होमिओपॅथिक फिजिशियन अँड काउन्सलर

Web Title: Air effective communication and active listening for children's development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.