पुण्याहून रायपूरसाठी विमानसेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:11 AM2021-09-27T04:11:46+5:302021-09-27T04:11:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे विमानतळावरून रायपूर शहरासाठी पहिल्यांदाच थेट विमानसेवा सुरू झाली आहे. इंडिगोने ही सेवा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे विमानतळावरून रायपूर शहरासाठी पहिल्यांदाच थेट विमानसेवा सुरू झाली आहे. इंडिगोने ही सेवा सुरू केली असून याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. ऑक्टोबर महिन्यात आणखी दोन ते तीन शहरांसाठी नव्याने विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे पुणे शहरांची देशातल्या मोठ्या व महत्त्वाच्या शहरांशी जोडले जाणार आहे.
कोविडच्या काळात जमिनीवर उतरलेली हवाई सेवा आता पुन्हा गगनभरारी घेत आहे. पुणे विमानतळवरून अद्याप आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली नसली तरीही देशांतर्गत विमानसेवेला आता चांगला प्रतिसाद लाभत आहे. ऑगस्ट महिन्यांत ४० ते ४५ दरम्यान विमनांची वाहतूक होत होती. ती आता ६०च्या घरात पोहोचली आहे. तसेच प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे.
बॉक्स : १
लवकरच दोन ते तीन शहरासाठी विमानसेवा :
पुणे विमानतळावर हवाई सेवा देणाऱ्या कंपन्या गेल्या काही दिवसांत पुण्याहून कोण कोणत्या शहरासाठी विमानसेवा सुरू करता येईल याचा अभ्यास करीत आहे. यात प्रवासी संख्या व उत्पन्न याचा प्रामुख्याने विचार करून त्याचा वेळेशी सांगड घालण्याचे प्रयत्न केले जात आहे. रायपूरनंतर ऑक्टोबर महिन्यात आणखी दोन शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. मात्र या बाबत गुप्तता पाळली जात आहे.