विमानतळ पुरंदर मध्येच होणार:जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:12 AM2021-03-23T04:12:52+5:302021-03-23T04:12:52+5:30

वाल्हे नजिक सुकलवाडी (ता.पुरंदर ) येथे आमदार संजय जगताप विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी जिल्हा ...

The airport will be in Purandar: Jagtap | विमानतळ पुरंदर मध्येच होणार:जगताप

विमानतळ पुरंदर मध्येच होणार:जगताप

googlenewsNext

वाल्हे नजिक सुकलवाडी (ता.पुरंदर ) येथे आमदार संजय जगताप विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार यांनी आमदार जगताप यांना पुरंदर विमानतळा बाबत विनंती केली की, "राजकारण्याच्या वादामध्ये विमानत तालुक्या बाहेर जाऊ देऊ नका. तालुक्याच्या विकासासाठी विमानतळ अत्यंत उपयोगाचं आहे". लोकांनीही ही मागणी पुढे रेटली. त्यानंतर आमदार जगताप म्हणाले की, पुरंदर विमानतळा बाबत तालुक्यात अनेक उलट सुलट चर्चा केल्या जातात. पण मी आज तुम्हाला सांगतो की, "विमानतळ हे पुरंदर मध्येच होईल, आणि विमानतळाच्या गेट बाबत अनेक उलट सुलट चर्चा केल्या जातात. पण मी आज पुरंदरच्या लोकांना संगतो की, विमानतळाचे गेट ही पुरंदर मध्येच होईल. एकाच दिशेने नाही तर आठ दिशांचे आठ दरवाजे ही पुरंदर मध्येच होणार विमानतळ हे योग्य ठिकाणीच होणार. त्यामूळे लोकांनी याबाबत चिंता करू नये

यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्या शालीनी पवार,

पुरंदर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदिप पोमण,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुष्कराज जाधव, वाल्हे गावचे विद्यमान सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, सुकलवाडीच्या विद्यमान सरपंच जयश्री चव्हाण, उपसरपंच धनंजय पवार, पोपट पवार, सूर्यकांत पवार, उद्योजक राहुल यादव, सुनिल पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संत्यवान सूर्यवंशी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदेश पवार, सामाजिक कार्यकर्ते जयवंत भुजबळ, दादा म्हञे, किरण कुमठेकर, बाबासाहेब भुजबळ, हनुमंत पवार, बाळासो भुजबळ, मदन भुजबळ, साईनाथ चव्हाण, डॉ.रोहिदास पवार, दिपक कुमठेकर, शरद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The airport will be in Purandar: Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.