‘नो एंट्री’ची ऐशी-तैशी

By admin | Published: May 12, 2016 01:24 AM2016-05-12T01:24:11+5:302016-05-12T01:24:11+5:30

शहरातील वाहतूक व्यवस्था समस्येबाबत वारंवार प्रशासकीय स्तरावर बैठका होऊनदेखील त्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नाही. शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात ‘नो एंट्री’ फलक लावले

Aishi-Taishi of 'No Entry' | ‘नो एंट्री’ची ऐशी-तैशी

‘नो एंट्री’ची ऐशी-तैशी

Next

बारामती : शहरातील वाहतूक व्यवस्था समस्येबाबत वारंवार प्रशासकीय स्तरावर बैठका होऊनदेखील त्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नाही. शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात ‘नो एंट्री’ फलक लावले गेले; परंतु बेशिस्त चारचाकी वाहनचालक बिनदिक्कतपणे ‘नो एंट्री’मध्ये घुसतात. त्यात चौकात एकही वाहतूक नियंत्रक पोलीस नसल्याने चारचाकी वाहनचालकांची मुजोरी आणखीनच वाढली आहे.
मागील आठवड्यामध्ये ‘लोकमत’ने शहरातील प्रमुख चौकांमधील वाहतूक समस्येवर प्रकाश टाकला होता. यामध्ये शहरातील भिगवण चौक, इंदापूर चौक, तीनहत्ती चौक, नेताजी सुभाषचंद्र चौक, गुणवडी चौक आदी ठिकाणांची वाहतूक समस्या गंभीर आहे. यावर नगरपालिका प्रशासनाने प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थित शहर पोलीस प्रशासनासोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये शहरातील प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या महावीर पथ, कचेरी रस्ता या रस्त्यांवरील दुहेरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. वाहतुकीचे नियम मोठ्या प्रमाणात पायदळी तुडवले जातात. नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील ‘नो एंट्री’चे फलक तर केवळ शोभेसाठीच उभे केले आहेत की काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वाहतूक समस्येबाबत प्रशासनच गंभीर नसेल तर समस्या सुटणार कशीअसाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Web Title: Aishi-Taishi of 'No Entry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.