Ajit Pawar Live: 'ओमायक्रॉनचा संसर्ग जोरात सुरू; पुणे शहरात आज 1 हजार 104 रुग्ण'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 06:35 PM2022-01-04T18:35:27+5:302022-01-04T18:44:37+5:30
या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे
पुणे: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्शभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तातडीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदे घेतली. या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे-
-दोन डोस घेतले तर कोरोनाचा धोका कमी असतो, त्यामुळे पुणेकरांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्यावेत.
- आज पुणे शहरात 1 हजार 104 कोरोनाचे नवे रुग्ण.
- पुणे जिल्ह्यातील 8 वी पर्यंतच्या शाळा बंद राहतील.
- नववी ते दहावीचे वर्ग सुरू राहतील, कारण या वयोगटातील मुलांना लस द्यायची आहे.
-ओमायक्रॉंनचा संसर्ग जोरात सुरू आहे. आगामी 40 ते 45 दिवसात याचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. जगातील 105 देशात याचा संसर्ग झाला आहे.
-आता ओमायक्रॉन भारतातही पसरत आहे. जगातील इतर देशात सुरवातीला ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे.
-रंगीबेरंगी, कापडी किंवा सर्जिकल मास्क वापरण्याऐवजी थ्री लेअर किंवा N95 मास्क वापरावे. साधे मास्क सुरक्षित नाहीत.
- उद्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यासाठी नियमावली लागू करावी यासंबंधी ऑर्डर काढली जाईल.
- पुण्यात उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड, आणि मास्क नसताना एखादा व्यक्ती थुंकला तर 1000 रुपये दंड आकाराला जाईल.
-लशीचे दोन्ही डोस घेतले तरच आता सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाईल. यापूर्वीही अनेकदा याचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले होते. परंतु आजवर याचे पालन झाले नाही. आता मात्र याची अंमलबजावणी केली जाईल.
- 10 जानेवारीपासून 60 वर्षावरील व्यक्तीला बूस्टर डोस दिला जाईल. फिल्डवर काम करणाऱ्या व्यक्तीला देखील बूस्टर डोस दिला जाणार आहे.
- हॉटेल, बार, शासकीय आणि खासगी आस्थापनामध्ये लशीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच प्रवेश दिला जाईल. घेतले नसतील तर अशा व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. याची सक्त अंमलबजावणी केली जाईल.
- ही नियमावली पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी लागू असेल.
-या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.