Ajit Pawar: अजित पवार पुण्याचे पालकमंत्री, बारामतीत फटाक्यांची आतषबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 19:16 IST2023-10-04T19:16:11+5:302023-10-04T19:16:47+5:30
राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाच्या वतीने शारदा प्रांगण येथील शहर पार्टी कार्यालयासमोर फटाके वाजवत पवार यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले...

Ajit Pawar: अजित पवार पुण्याचे पालकमंत्री, बारामतीत फटाक्यांची आतषबाजी
बारामती (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर बारामतीमधीलराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाच्या वतीने शारदा प्रांगण येथील शहर पार्टी कार्यालयासमोर फटाके वाजवत पवार यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्याकडून अजित पवारांचे अभिनंदन करण्यात आले. अजित पवार यांच्या पालकमंत्रीपदाचा पुणे जिल्ह्यासह बारामती तालुक्याला आणि शहराला होईल, असे मत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जय पाटील, विशाल जाधव, साधू बल्लाळ, प्रताप पागळे, महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, श्रीकांत जाधव, प्रताप पागले, आदित्य हिंगणे, विशाल जाधव, सूरज शिंदे, साधू बल्लाळ, संतोष जगताप, सुधाकर माने व इतर कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते.