अजित पवार यांचा लंडनच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:13 AM2021-09-08T04:13:43+5:302021-09-08T04:13:43+5:30
कोरोनामुक्तीसाठी केलेल्या कार्याची दखल बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात कोरोनामुक्तीसाठी केलेल्या कार्याची दखल लंडनच्या ...
कोरोनामुक्तीसाठी केलेल्या कार्याची दखल
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात कोरोनामुक्तीसाठी केलेल्या कार्याची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसच्या वतीने घेण्यात आली असून, त्याबाबत त्यांनी पवार यांच्या गौरवाप्रीत्यर्थ सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट (स्वीत्झर्लंड) असे सन्मानपत्र प्रदान केले.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस, युरोप येथील अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात ७० देशांमध्ये कोरोनामुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे. कोरोनामुक्तीसाठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी या संस्थेमार्फत व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यात येत आहे.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडनचे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना मंत्रालयातील उपमुख्यमंत्री दालनात या पुरस्काराने सन्मानित केले. उपमुख्यमंत्री पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले धडाडीचे व झटपट निर्णय, वैद्यकीय सुविधा प्राप्त करून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन पुरस्कार दिला गेला आहे.
————————————
फोटो ओळी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुरस्कार देताना बुक ऑफ रेकॉर्डस, लंडनचे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके.
०७०९२०२१-बारामती-०४
————————————————