अजित पवार यांच्या आदेशाला ‘अक्षता’

By admin | Published: June 17, 2016 05:18 AM2016-06-17T05:18:58+5:302016-06-17T05:18:58+5:30

‘राज्य किंवा केंद्र सरकारच्या चुकीच्या गोष्टींविरोधात रस्त्यावर उतरा, प्रखर विरोध करा, आक्रमक बना, निदर्शने करा, असा आदेश माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना

Ajit Pawar's order 'Akshata' | अजित पवार यांच्या आदेशाला ‘अक्षता’

अजित पवार यांच्या आदेशाला ‘अक्षता’

Next

पिंपरी : ‘राज्य किंवा केंद्र सरकारच्या चुकीच्या गोष्टींविरोधात रस्त्यावर उतरा, प्रखर विरोध करा, आक्रमक बना, निदर्शने करा, असा आदेश माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर वाढती गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यास पन्नासही पदाधिकारी उपस्थित नव्हते. ‘नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे’ अशी अवस्था स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची झाली आहे. एकमुखी सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादीने केवळ दिखाऊपणासाठीच आंदोलन केल्याची टीका होत आहे.
आकुर्डी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बंडखोरीवर भाष्य केले होते. तसेच पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचवा, केंद्र व राज्य सरकारने राबविलेली चुकीची धोरणे
यांचा निषेध तातडीने करा, तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक बना, असे आवाहन केले होते. त्यानुसार शहर राष्ट्रवादीने आज वाढत्या गुन्हेगारीचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले. (प्रतिनिधी)

नगरसेवकांची दांडी
- महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ८२ नगरसेवक आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विविध समित्यांचे सभापती, प्रभागाध्यक्ष हे राष्ट्रवादीचेच आहेत. शिक्षण मंडळावरही आठ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. मुख्य पदाधिकारी वगळता अन्य नगरसेवक आंदोलनाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे हे आंदोलन केवळ दिखाऊपणासाठीच तर केले नसावे ना, अशी टीका होत आहे.

Web Title: Ajit Pawar's order 'Akshata'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.