नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला अजित पवारांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:20+5:302021-07-17T04:10:20+5:30

पुणे : महापालिकेच्या वतीने बाणेर येथे उभारण्यात आलेल्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी ...

Ajit Pawar's visit to the newly dedicated Kovid Hospital | नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला अजित पवारांची भेट

नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला अजित पवारांची भेट

Next

पुणे : महापालिकेच्या वतीने बाणेर येथे उभारण्यात आलेल्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली़ या वेळी येथे उभारण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेत वैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.

या वेळी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, स्थानिक नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

पवार यांनी या पाच मजली हॉस्पिटलची पाहणी करून, येथे उभारण्यात आलेल्या दोन आॅक्सिजन प्लँटसह हॉस्पिटलमधील खाटांची क्षमता, आयसीयूमध्ये असलेल्या सोईसुविधा यांचा आढावा घेऊन, हॉस्पिटलमधील तयारीबाबत समाधान व्यक्त केले़

--------------

चौकट :-

२०९ खाटांची क्षमता

बाणेर येथील नवीन डेडिकेट कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण खाटांची क्षमता २०९ इतकी असून, यापैकी १४७ खाटा या आॅक्सिजन सुविधेसह तयार आहेत़ तर ६२ आयसीयू खाटा (अतिदक्षता विभाग) आहेत़

------------

फोटो मेल केला आहे़

Web Title: Ajit Pawar's visit to the newly dedicated Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.