सेल्फीच्या जमान्यात त्याने दाखवलेल्या माणुसकीने वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 04:26 PM2019-07-27T16:26:11+5:302019-07-27T16:29:12+5:30
अपघात झाल्यावर जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात भरती करायचे सोडून त्याला बघत गर्दी करून सेल्फी घेणाऱ्यांमध्ये सामील न होता एकाचा प्राण वाचवणाऱ्या आकाश दत्त या तरुणाचे पुणे पोलिसांनी खास कौतुक केले आहे.
पुणे :अपघात झाल्यावर जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात भरती करायचे सोडून त्याला बघत गर्दी करून सेल्फी घेणाऱ्यांमध्ये सामील न होता एकाचा प्राण वाचवणाऱ्या आकाश दत्त या तरुणाचे पुणे पोलिसांनी खास कौतुक केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी आकाश हे कामावरून रात्री तीन वाजता जात तसं त्यांना वाघोली रस्त्यावर एक घोळका दिसला. तिथे काही दुर्घटना तर घडली असावी या शंकेने त्यांनी गाडी थांबवली. घोळक्यात शिरून बघितले असता तिथे त्यांना संगणक अभियंता राघव प्रताप सिंग जखमी झालेले दिसले. दुर्दैवाने तिथे थांबलेल्या कोणीही सिंग यांना रुग्णालयात नेण्याची तयारी दाखवली नव्हती. तोवर त्यांचा रक्तस्त्राव सुरूच होता. आकाश यांनी त्यावेळी काही गाड्याही थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही थांबले नाही. अखेर मार्केट यार्डला भाजी घेऊन जाणारा टेम्पो थांबला आणि त्यातून त्यांनी जखमी सिंग यांना रुग्णालयात दाखल केले.सुदैवाने वेळेत दाखल केल्याने अनर्थ टळला आणि त्यांचे प्राण वाचले.
त्यांच्या याच कामाबद्दलचे कौतुक म्ह्णून पुणे पोलीस दलाचे आयुक्त डॉ के वेंकटेशम, सह आयुक्त रवींद्र शिसवे, वाहतूक विभागाचे पोलीस उपयुक्त पंकज देखमुख आणि राघव प्रताप सिंगयांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.