बिबवेवाडीत अखंड सूर्यनमस्कार महायज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:14 AM2021-02-23T04:14:45+5:302021-02-23T04:14:45+5:30
पुणे : उत्तम आरोग्यासाठी सूर्यनमस्कार अत्यंत परिणामकारक असून विशेषतः स्त्रियांसाठी नियमित सूर्यनमस्कार घालणे फायदेशीर असल्याचे मत योग अभ्यासक जयंत ...
पुणे : उत्तम आरोग्यासाठी सूर्यनमस्कार अत्यंत परिणामकारक असून विशेषतः स्त्रियांसाठी नियमित सूर्यनमस्कार घालणे फायदेशीर असल्याचे मत योग अभ्यासक जयंत कवठेकर यांनी व्यक्त केले.
बिबवेवाडीतील चिंतामणीनगर भाग ३ मध्ये अखंड सूर्यनमस्कार महायज्ञ झाला. रा. स्व. संघ जनकल्याण समिती, पर्वती भाग पुणे आणि चिंतामणी नगर भाग तीन, बिबवेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी, आयोजक मनोज पटवर्धन, नरहरी होनप, शिवाजी मालेगावकर, विशाल नेरकर, मोहित आळशी, स्वानंद पटवर्धन आदी उपस्थित होते.
रविवारी सकाळी ७ वाजून ३ मिनिटांवर सूर्योदयापासून ते संध्याकाळी ६ वाजून ३४ मिनिटांनी सूर्यास्तापर्यंत नागरिकांनी सूर्यनमस्कार घातले. या उपक्रमात एकूण १३७ नागरिकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या उपक्रमात ६० पेक्षा अधिक महिलांचा सहभाग होता.
सर्वांना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले होते. सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आलेली होती. सुरक्षित अंतराचे नियम पाळून सर्वजण सहभागी झाले होते. सहभागाबद्दल प्रमाणपत्र, सूर्यनमस्कार माहितीपत्रक देण्यात आले.
----------
या उपक्रमामध्ये पुण्यातील विविध भागांतून नागरिक आले होते. तसेच ठाण्यातून एक साधक सहभागी झाले होते. तर, अमेरिका, ओमान, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामधून ऑनलाईन पद्धतीनेही काही साधक सहभागी झाल्याची माहिती आयोजक योगतज्ञ मनोज पटवर्धन यांनी दिली.