जुन्नर, आंबेगावमध्ये रंगणार निवडणुकीचा आखाडा
By admin | Published: March 15, 2016 04:01 AM2016-03-15T04:01:34+5:302016-03-15T04:01:34+5:30
जिल्ह्यात प्रामुख्याने जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात एप्रिल महिन्यात जत्रा-यत्राबरोबरच ग्रामपंचायत निवडणुकांचा आखाडा रंगणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जुन्नर, आंबेगाव
पुणे : जिल्ह्यात प्रामुख्याने जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात एप्रिल महिन्यात जत्रा-यत्राबरोबरच ग्रामपंचायत निवडणुकांचा आखाडा रंगणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जुन्नर, आंबेगाव आणि बारामती तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मे ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या पुणे जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये २७ ग्रामपंचायती जुन्नर तालुक्यातील तर १४ आंबेगाव व २ बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकासाठी १८ मार्च रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर २९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १७ एप्रिल रोजी मतदान होऊन १८ एप्रिल रोजी मतमोजणी करण्यात येईल़
निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय माहिती पुढील प्रमाणे
जुन्नर ...
भिवाडे बु, उंडेखडक, राजूर, पिंपळगाव जोगा, कोपरे, मांडवे, घाटघर, अंजनावळे, इंगळूण, तांबे, पूर, जळवंडी, हडसर, देवळे, घंगाळदरे, मढ, गोद्रे, सितेवाडी, खुबी, चावंड, खानगाव, पारगाव तर्फे मढ, उच्छिल, तेजूर, आपटाळे, तळेरान, आंबोली.
आंबेगाव...
आंबेगाव गावठाण, थोरांदळे, पंचाळे बु., माळीण, पोखरी, जांभोरी, राजपूर, ढाकाळे, गंगापूर बु., पिंपळगांव तर्फे घोडा, राजेवाडी, कोंढावळ, शिनोली, आसाने, बारामती... जळगाव क. प व भिलारेवाडी.