अक्षय बोऱ्हाडेवर खंडणीनंतर पत्नीवर छळ केल्याचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:12 AM2021-09-03T04:12:17+5:302021-09-03T04:12:17+5:30
जुन्नर पोलिसांनी अक्षय मोहन बोऱ्हाडे याच्यासह सासू सविता मोहन बोऱ्हाडे आणि दीर अनिकेत मोहन बोऱ्हाडे यांच्यावर गुन्हा दाखल ...
जुन्नर पोलिसांनी अक्षय मोहन बोऱ्हाडे याच्यासह सासू सविता मोहन बोऱ्हाडे आणि दीर अनिकेत मोहन बोऱ्हाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रुपाली अक्षय बोऱ्हाडे (वय २४, सध्या रा. तळेरान, ता. जुन्नर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
अक्षय मोहन बोऱ्हाडे, सविता मोहन बोऱ्हाडे, अनिकेत मोहन बोऱ्हाडे यांनी संगनमताने रुपाली बोऱ्हाडे यांना त्रास दिला. अक्षय याने वेळोवेळी रिव्हाल्व्हर आणि गुंडांची धमकी देऊन शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. स्वतः कोणतेही काम न करता शिवऋण युवा प्रतिष्ठान या संस्थेसाठी आलेला निधी स्वतःच्या चैनीसाठी अपहार करून वेगवेगळ्या मुलींसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करून त्यांची व आपली फसवणूक केल्याचे रुपाली बोऱ्हाडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
चौकट : अक्षय मोहन बोऱ्हाडे हा शिवऋण युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष असून या संस्थेच्या माध्यमातून रस्त्यावर फिरणारे मानसिक, मनोरुग्ण, निराधार व्यक्तींना महाराष्ट्राच्या अनेक भागातून आणून शिरोली (ता. जुन्नर) येथे त्यांची सेवा करीत असे. मात्र, काही दिवसांपासून अनेक वेळा तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रुपाली अक्षय बोऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला असल्याने पोलीस चक्रावून गेले असून त्यांच्या माहितीची पोलीस पडताळणी करीत आहे.