आकुर्डीत आज समस्यांचा जागर

By admin | Published: February 9, 2015 04:02 AM2015-02-09T04:02:55+5:302015-02-09T04:02:55+5:30

रखडलेल्या योजना, प्रकल्प, विकासाकडे होणारे दुर्लक्ष अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ हा कार्यक्रम आकुर्डी गावठाण प्रभागात

Akurdy's troubles today | आकुर्डीत आज समस्यांचा जागर

आकुर्डीत आज समस्यांचा जागर

Next

पिंपरी : रखडलेल्या योजना, प्रकल्प, विकासाकडे होणारे दुर्लक्ष अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ हा कार्यक्रम आकुर्डी गावठाण प्रभागात सोमवारी (९ फेब्रुवारी) दुपारी ४ ते ६ या वेळेत होणार आहे.
‘पिंपरी चिंचवडचा ऱ्हास आता बास’ ही विशेष मोहीम ‘लोकमत’ने सुरू केली आहे. यातून नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न जनतेसमोर आणून चर्चा घडविली जात आहे. सामान्य नागरिक, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशी चर्चा या उपक्रमातून घडवून आणली जाते. प्रश्न, समस्यावरील चर्चा व त्याचे निराकरण करणे हा त्यामागचा उद्देश आहे. ‘लोकमत आपल्या दारी’ हा पहिला उपक्रम चिंचवडमध्ये राबविण्यात आला. त्यानंतर मोरवाडी, पिंपरी, कृष्णानगर, शाहूनगर, संभाजीनगर, केशवनगर, भोसरी, चऱ्होली या प्रभागात राबविण्यात आला. त्यास मोठा प्रतिसाद
मिळाला. या उपक्रमांच्या माध्यमातून नागरी प्रश्न सोडविले जात असल्याने नागरिकांच्या वतीने या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.
पुणे-मुंबई महामार्गालगत वसलेल्या आकुर्डी गावठाण प्रभागात (प्रभाग १६) कामगार, कष्टकरी, उच्च, मध्यमवर्गीय नागरीक वास्तव्यास आहे. या परिसरात अजूनही गावपण टिकून आहे. गावजत्रा, ग्रामदैवत खंडेराय उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. एकात्मकतेचे दर्शन विविध उपक्रमांमधून दिसत असते. या भागातील नागरी प्रश्नावर चर्चा घडावी, प्रश्न सुटावेत, याच उद्देशाने पांढारकर सभागृहात ‘लोकमत आपल्या दारी’चे आयोजन केले आहे.
यामध्ये विद्यमान नगरसेवक निलेश पांढरकर, नगरसेविका प्रतीभा भालेराव यांच्यासह प्रभागस्तरावरील अधिकारी सहभागी होत आहेत. त्यांच्यासमोर पदपथावरील अतिक्रमणे, रोडरोमीयोंचा त्रास, अरूंद रस्ते त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, खोदलेले रस्ते, पांडूरंगबुवा काळभोर सभागृह परिसरातील गाळ्यांचे गायब झालेल्या शटर्स, पंचतारानगर परिसरातील कचराकुंड्या, नाल्यांमध्ये साचलेला राडारोडा, वाढलेली गुन्हेगारी आदी प्रश्नावर सामान्य नागरिकांना मते मांडता येणार आहे. या प्रश्नावर चर्चा घडवून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Akurdy's troubles today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.