माऊलींच्या स्वागतासाठी आळंदी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:32 AM2018-08-07T01:32:27+5:302018-08-07T01:32:44+5:30
ज्ञानोबा-माऊली' असा नामजयघोष, टाळ-मृदंगाच्या गजरात श्री ज्ञानेश्वर-माऊलींचा वैभवी पालखी सोहळा उद्या मंगळवारी (दि.७) आषाढीवारीनंतर अलंकापुरी नगरीत प्रवेशत आहे.
आळंदी : ज्ञानोबा-माऊली' असा नामजयघोष, टाळ-मृदंगाच्या गजरात श्री ज्ञानेश्वर-माऊलींचा वैभवी पालखी सोहळा उद्या मंगळवारी (दि.७) आषाढीवारीनंतर अलंकापुरी नगरीत प्रवेशत आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतास अलंकानगरी सज्ज झाली आहे. बुधवारी (दि.८) आळंदीत ‘श्रीं’च्या पालखीची नगरप्रदक्षिणा होणार आहे.
३२ दिवसांच्या प्रवासानंतर माऊलींच्या आषाढी वारीचा आनंद सोहळा अलंकापुरीत पुण्यातील प्रथमच परतीच्या प्रवासात ३ दिवसांच्या मुक्कामानंतर प्रवेश करणार आहे.
आळंदीत आषाढी एकादशीदिनी दिंड्यांच्या हजेरीच्या कार्यक्रमांनी बुधवारी (दि. ८) हरिनाम
जयघोषात सोहळ्याची सांगता होणार आहे.
‘श्रीं’च्या पालखी सोहळ्याच्या स्वागतास येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयासह आळंदी नगर परिषद शाळांतील मुले, वारकरी, भाविक, नागरिक, बॅण्ड पथक, परंपरेने स्वागत करण्यास माऊली मंदिरातून दिंडी आणि महानैवेद्य हरिनाम गजरात जाणार आहे.
पालखी सोहळा आळंदीत प्रवेशताच हरिनाम गजरात स्वागत होणार आहे. आळंदीच्या
नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माउली
वीर, विष्णुबुवा चक्रांकित महाराज परिवार आदींसह आळंदीकर नागरिक भाविक आळंदीत स्वागत करणार आहेत.
इंद्रायणी नदी किनाऱ्यावरील वेशीवर भागेश्वरी धर्मशाळेजवळ सोहळ्याचे प्रथम स्वागत होईल. या ठिकाणी आरती व पूजा झाल्यानंतर दही-भाताचा महानैवेद्य वाढविण्यात येईल.
त्यानंतर सोहळ्यातील वैभवी बाळासाहेब भोसले यांचा सनई चौघड्याचा आकर्षक नगारखान्याच्या आळंदीत प्रथम होत श्रींचा वैभवी पालखी सोहळा आळंदीत प्रवेशल.
>पिठलं भाकरी महाप्रसाद
पालखीची नगरप्रदक्षिणा
बुधवारी (दि.८) एकादशी असल्याने माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणेस सकाळी साडेअकराच्या सुमारास मंदिरातील देऊळवाड्यातून बाहेर येईल. हजेरी मारुती मंदिरात बारा वाजता दिंड्यांची हजेरी होणार आहे. येथे प्रथेने दिंड्याची हजेरी नारळ प्रसाद वाटप होणार आहे. विष्णुबुवा महाराज चक्रांकित यांच्या वतीने श्री नरसिंह सरस्वती स्वामीमहाराज मूळपीठावर पिठलं-भाकरी महाप्रसाद वाटप परंपरेने मंगळवारी (दि.७) करण्यात येणार आहे. तसेच, येथील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील भाविकांना अन्नदान सेवा देण्यात येणार आहे.