आळंदीत वाहतुकीचा प्रश्न गंभीर

By Admin | Published: May 6, 2015 05:52 AM2015-05-06T05:52:20+5:302015-05-06T05:52:20+5:30

अलंकापुरीतील वाहतूककोंडीची समस्या काही केल्या मार्गी लागत नसल्याची सत्यस्थिती समोर येत आहे.

Alandi traffic question is serious | आळंदीत वाहतुकीचा प्रश्न गंभीर

आळंदीत वाहतुकीचा प्रश्न गंभीर

googlenewsNext

शेलपिंपळगाव : अलंकापुरीतील वाहतूककोंडीची समस्या काही केल्या मार्गी लागत नसल्याची सत्यस्थिती समोर येत आहे. विवाह कार्यालयांची भररस्त्यावर बेशिस्तरीत्या होत असलेल्या पार्किंगमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. आज सकाळपासून शहरील सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रवाशांना स्वता: वेळ घालून प्रयत्न करावे लागत आहे. विवाह कार्यालयांच्या बाहेर भररस्त्यावर बेशिस्त केल्या जाणाऱ्या पार्किंगवर पोलीस प्रशासन कारवाई का करीत नाही? असा सवाल समोर येऊ लागला आहे.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये तासनतास वाहन चालकांना ह्यब्रेकह्ण लावून ताटकळत उभे राहावे लागत आहे. सायंकाळच्या वेळी भररस्त्यात छोट्या झ्र मोठ्या व्यावसायिकांचे होणारे अतिक्रमण या समस्येत अधिक भर घालत असल्याची सत्यस्थिती आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे काही ठिकाणी वाहनचालकांमध्ये वाहने मागे झ्र पुढे घेण्यावरून वाद होण्याच्या घटना फोफावत चालल्या आहेत. तर वाहतूक कोंडीतून मार्ग काढणा?्या दुचाकी महागड्या चारचाकी वाहनांना घासून जात असल्याने अनेक ठिकाणी ह्यतु- तु मै झ्र मैह्णची परिस्थिती निर्माण होत आहे.
सध्या विवाह सभारंभाचे अधिक मुहर्त असल्याने आळंदी नित्याने गजबजलेली असते. शहरातील विविध ठिकाणची विवाह कार्यालये, धमर्शाळा, मंदिरे आदी ठिकाणी विवाह सभारंभ पार पडत असल्याने बाहेरील गावावरून व?्हाडी लोकांची अनेक वाहने सातत्याने अलंकापुरीत येत असतात. मात्र अशा वाहनांना आळंदीतील वाहतूक कोंडीचा सामना करत इच्छितस्थळी पोहोचावे लागत आहे. मनस्ताप सहन करून सर्वच वाहनचालकांना मार्ग काढावा लागत आहे. आज दिवसभर आळंदीतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होऊन शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या लांबच झ्र लांब रांगा लागल्या होत्या. चाकण आद्योगिक वसाहतीकडून आळंदीमार्गे पुणे झ्र नगर मार्गाकडे जाणार्या अवजड वाहनामुळे वाहनांच्या रांगा अधिक होत होत्या. चाकण चौक, नगरपालिका चौक, पोलीस ठाणे परिसर, मरकळ चौक, वडगाव चौक आदी ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या अधिक प्रमाणात होत आहे. शहरात ठिकठिकाणी असलेले अरुंद रस्ते वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिक भर घालत आहेत. मरकळ रस्त्यावर ऊस मालाची वाहतूक करणारा अवजड कंटेनर भर रस्त्यावर नादुरुस्त होऊन उभा राहिल्याने शहरात येणा?्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला होता. तर वडगाव रस्त्यावर ज्ञानसागर मंगल कार्यालयासमोर उभ्या असलेल्या अवजड कंटेनरमुळे सर्वच वाहतूक सुमारे दीडतास ठप्प झाली होती. तर कोसमोस बँकेशेजारी रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्यामुळे वाहनचालकांना कसरत करून मार्गस्थ व्हावे लागत आहे. शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी आळंदी पोलिसांना चांगलाच घाम
गाळावा लागला. (वार्ताहर)

वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे अजिबात पालन होत नाही. शहरातील अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीची समस्या अधिक जाणवते. मंगळवारी संपूर्ण शहरात वाहतूककोंडी झाली होती. मात्र, स्वत: माझ्यासह ८ ते ९ पोलीस कमर्चारी वाहतूक नियंत्रण करीत होते. बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
- कुमार कदम, पोलीस निरीक्षक, आळंदी

Web Title: Alandi traffic question is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.