आळंदीकरांना येत्या महिनाभरात मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:16 AM2021-08-20T04:16:33+5:302021-08-20T04:16:33+5:30

आळंदीकरांना येत्या महिनाभरात मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी आळंदी : भामा-आसखेड धरणातून पुणे महापालिकेने कुरुळीपर्यंत आणलेले पाणी थेट बंद पाईपलाईनद्वारे ...

Alandikars will get clean drinking water in the coming months | आळंदीकरांना येत्या महिनाभरात मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी

आळंदीकरांना येत्या महिनाभरात मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी

Next

आळंदीकरांना येत्या महिनाभरात मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी

आळंदी : भामा-आसखेड धरणातून पुणे महापालिकेने कुरुळीपर्यंत आणलेले पाणी थेट बंद पाईपलाईनद्वारे आळंदीत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या हे काम ९५ टक्के पूर्ण होत असून उर्वरित कामही महिनाभरात मार्गी लागणार आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात आळंदीकरांना स्वच्छ व पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आळंदीत पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी आळंदी पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत शासनाला थेट भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता. त्यानुसार आळंदीला भामा आसखेडचे पाणी बंदीस्त नलिकांतून आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या चिंबळी येथे रस्त्यालगतची ड्रेनेजलाईन फुटली असल्याने कामात अडचण निर्माण झाली होती. सदरचे काम आळंदी नगरपरिषदेने स्वखर्चाने मार्गी लावून ठिकठिकाणी चेंबर तयार करून ड्रेनेज दुरुस्त करून घेतले आहे. त्यामुळे पुढील कामाला पुन्हा वेग येणार आहे.

या पार्श्वभूमीवर पाईप लाइनच्या कामाची पाहणी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, माजी उपनगराध्यक्ष सागर बोरुंदीया, माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, अशोक उमरगेकर, नगरसेविका रुक्मिणी कांबळे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख अक्षयकुमार शिरगिरे, दत्तात्रय सोनटक्के आदींनी केली. यावेळी पाईपलाईन प्रत्यक्ष जागेवर जाऊन पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच पाईपलाईन कामादरम्यान सद्यस्थितीत असलेल्या अडचणींची माहिती घेत संबंधित यंत्रणांशी संवाद साधत त्यावरील उपाययोजना केल्या. येत्या एक महिन्यात सर्व काम पूर्ण होऊन चाचणी करण्यात येणार असल्याचे संबंधित ठेकेदाराने सांगितले.

फोटो ओळ : आळंदीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या कामाची पाहणी करताना नगरपरिषदेचे पदाधिकारी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)

Web Title: Alandikars will get clean drinking water in the coming months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.