पाण्यासाठी आळंदीकरांची मानवी साखळी
By admin | Published: March 29, 2016 03:30 AM2016-03-29T03:30:25+5:302016-03-29T03:30:25+5:30
‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे...’ अशा घोषणा देत सोमवारी आळंदीकरांनी प्रदक्षिणा मार्गावर मानवी साखळी धरून आंदोलन केले. आम्हाला फक्त ५ एमएलडी
आळंदी : ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे...’ अशा घोषणा देत सोमवारी आळंदीकरांनी प्रदक्षिणा मार्गावर मानवी साखळी धरून आंदोलन केले. आम्हाला फक्त ५ एमएलडी
पाण्याची आवश्यकता आहे. शासनाने याच जलवाहिनीतूनच आळंदीसाठी पाणी द्यावे, अन्यथा ही योजना पूर्ण होऊ देणार नसल्याचा इशारा सर्वपक्षीयांनी दिला.
भामा आसखेडचे पाणी हे आळंदीवरूनच पुढे पुण्यापर्यंत जाणार आहे, असे असताना आळंदीसाठी स्वतंत्र अशी लाइन टाकून खुशाल पाणी घ्या, असे सांगितले जाते. यामुळे आळंदीकर संतप्त झाले आहेत.
चाकण चौकातून प्रदक्षिणा मार्गाने भैरोबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आळंदी नगरपालिका चौक, महाद्वारात ठिय्या आंदोलन केले. या वेळी आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, नगरसेवक डी. डी.भासले-पाटील, अशोक कांबळे (उमरगेकर), प्रदीप बवले, सचिन पाचुंदे, उपनगराध्यक्षा अंजनाताई कुऱ्हाडे, माधवी चोरडिया, सुलोचना नेवसे, प्रतिमा गोगावले, अलका बवले, वंदना सोनवणे, उषा नरके, प्रकाश कुऱ्हाडे, रूपाली पानसरे,
संदीप नाईकरे, नंदकुमार वडगावकर, सुलतान शेख, मल्हार काळे, अशोक पांढरे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका, विविध क्षेत्रांतील मान्यवर, वारकरी सांप्रदायातील भाविक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (वार्ताहर)