पुण्यातील एका मद्य विक्रेत्याने दिवाळीनिमित्त काढली बिअर कॅनने रांगाेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 08:19 PM2018-11-07T20:19:47+5:302018-11-07T20:22:38+5:30
पुण्यातील लाॅ काॅलेज रस्त्यावरील एका मद्यव्यवसायिकाने दिवाळीनिमित्त थेट बियर कॅनचा वापर करुन रांगाेळी काढली.
पुणे : पुणे तिथे काय उने असे म्हंटले जाते. पुणेकर अापल्या वेगळ्या अंदाजासाठी अाेळखले जातात. पुण्यातील लाॅ काॅलेज रस्त्यावरील एका मद्य विक्रेत्याने दिवाळीनिमित्त थेट बियर कॅनचा वापर करुन रांगाेळी काढली. ही रांगाेळी येथून जाणाऱ्या नागरिकांच्या चर्चेचा विषय झाली हाेती.
दिवाळीत घराेघरी तसेच दुकानांच्यासमाेर रांगाेळी काढली जाते. प्रत्येकजण अापअापल्या परीने रांगाेळीत रंग भरत असतात. पुण्यातल्या लाॅ काॅलेज रस्त्यावरील एका मद्य विक्रेत्याने थेट रांगाेळी भाेवती बियरचे कॅन ठेवत रांगाेळीत चांगलेच रंग भरले. पणतीच्या अाकाराची रांगाेळी काढत या विक्रेत्याने त्या बाजूने बियरचे कॅन ठेवले हाेते. तसेच शुभ दिपावली लिहीत मद्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या दुकानासमाेरुन जाणारे नागरिक या रांगाेळीकडे कुतूहलाने पाहत हाेते. अनेकांनी या रांगाेळीचे फाेटाेही अापल्या माेबाईलमध्ये घेतले. मद्य विक्रेत्याची ही भन्नाट कल्पना नागरिकांना चांगलीच भावली.
या दुकानाचे व्यवस्थापक म्हणाले, दरवर्षी अाम्ही दिवाळीनिमित्त दुकानासमाेर रांगाेळी काढत असताे. यंदा काहीतरी वेगळे करावे या हेतूने रांगाेळीच्या बाजूने गाेलाकार बियरचे कॅन ठेवले. हे कॅन ठेवल्याने नागरिक कुतुहलाने या रांगाेळीकडे पाहत हाेते. अनेकांनी या रांगाेळीचे फाेटाेही काढले. केवळ वेगळं काहीतरी म्हणून अशाप्रकारे ही रांगाेळी काढली.