आळेफाटा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरी; परजिल्ह्यातील टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 04:29 PM2024-01-17T16:29:52+5:302024-01-17T16:32:22+5:30

सात आरोपींसह दोन सोनार असे ऐकून नऊ आरोपींचा यामध्ये समावेश असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले

Alephata bus stand robbery taking advantage of crowd gang in the district | आळेफाटा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरी; परजिल्ह्यातील टोळी गजाआड

आळेफाटा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरी; परजिल्ह्यातील टोळी गजाआड

आळेफाटा : बसमधील प्रवासी महिलेंचे दागिने चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील सराईत टोळीला आळेफाटा पोलिसांनीअटक केली. त्यांच्याकडून ७ तोळे सोन्याचे दागिने व जीप असा एकूण ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सात आरोपींसह दोन सोनार असे ऐकून नऊ आरोपींचा यामध्ये समावेश असल्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे  यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, विजय औटी हे डिसेंबर २०२३ मध्ये आळेफाटा एसटी बसस्थानकातून मुंबई येथे जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढत होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. याबाबतची फिर्याद आळेफाटा पोलिस ठाण्यात औटी यांनी दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. आरोपींबाबत काहीही पुरावा नसताना गुन्हे शोध पथकाने आळेफाटा परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून तांत्रिक माहितीवरून सोनसाखळी चोरणारे चारचाकी वाहनातून येत आळेफाटा बसस्थानकात गर्दीत  शिरून प्रवाशांचे दागिने चोरत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार त्या चारकाची वाहनाचा क्रमांक प्राप्त करून चोरट्यांची नावे व पत्ता पोलिसांनी निष्पन्न केला. त्यानंतर पोलिस पथकाने वेशांतर करत बीड जिल्ह्यातील पाडळशिंगी टोलनाक्यावर सापळा रचून चोरट्यांना जीपसह (एम. एच. 44 बी. ७१३७) पकडले. त्यांनी आळेफाटा बसस्थानक परिसरात एप्रिल २०२३ नंतर ४ गुन्हे केल्याची कबुली दिली.

रामेश्वर अंबादास जाधव (रा. शिरापूर, जि. बीड), विकास शिवाजी गायकवाड (रा. दहिटणा, जि. जालना), आकाश अशोक जाधव (रा. सलगरा, जि. लातूर), दीपक ज्ञानेश्वर जाधव (रा. शिरापूर, जि. बीड), सागर संपतराव झेंडे (रा. बीड), जालिंदर वामन डोकडे (रा. शिरूर कासार, जि. बीड), आरिफ रहेमान शेख (रा. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर या चोरट्यांनी चोरलेले दागिने विकत घेणाऱ्या अण्णा ढेपे व आकाश बेंद्रे या सोनारांनाही अटक करण्यात आली. एकूण ७ तोळे सोन्याचे दागिने व जीप जप्त करण्यात आली. पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, विनोद गायकवाड, नरेंद्र गायकवाड, भीमा लोंढे, संजय शिंगाडे, संतोष दुपारगुडे, अमित माळुंजे, नवीन आरगडे, हनुमंत ढोबळे, केशव कोरडे आदी पोलिस कर्माचाऱ्यांनी ही कारवाई केली. दरम्यान आळेफाटा पोलिसांनी  बसस्थान परिसरात गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरी करणाऱ्या वेगवेगळ्या टोळींकडुन १८ गुन्हे उघडकीस आणले असुन त्यांच्याकडुन जवळपास ५३ तोळे सोने व १५ तोळे चांदीचे दागीने जप्त केले आहे.

Web Title: Alephata bus stand robbery taking advantage of crowd gang in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.