जातेगावच्या सरपंचपदी अलका होळकर, तर उपसरपंचपदी गणेश उमाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:14 AM2021-02-26T04:14:12+5:302021-02-26T04:14:12+5:30
जिल्ह्यात अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सदाशिव पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल विजयी झाले. त्यांना पाच तर ...
जिल्ह्यात अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सदाशिव पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल विजयी झाले. त्यांना पाच तर विरोधी गटाला चार जागा मिळाल्या. सरपंच व उपसरपंच झालेल्या निवडणुकीमध्ये प्रकाश पवार यांच्या गटाच्या अलका सुनील होळकर यांची सरपंच व उपसरपंचपदी गणेश दत्तात्रय उमाप यांची निवड झाली.
या वेळी सदस्य राहुल पवार, किशोर खळदकर, सुमन क्षीरसागर , पुणे जिल्हा विकास मंचाचे अध्यक्ष सदाशिव पवार, जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका केशरताई पवार, अनिल होळकर, सुरेश उमाप, रमेश फणसे ,हनुमंत शिरसागर, दत्ता उमाप ,साहेबराव उमाप, रंगनाथ इंगवले ,लहू पोतळे, रामभाऊ मोरे, बी. बी. क्षीरसागर, शरद उमाप यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली.
राज्यांचे मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार पोपटराव गावडे यांनी विजयी सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन केले . तसेच नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांनी सर्वांना विश्वासात घेऊन माजी सभापती प्रकाश पवार, सदाशिव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगितले.
माजी सभापती प्रकाश पवार म्हणाले की, या भागाचे आमदार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामांना निधी दिला असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे या भागातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली आहे.
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करताना माजी सभापती प्रकाश पवार, उद्योजक सदा आण्णा पवार, जिल्हा दूध संघाच्या संचालिका केशरताई पवार व इतर.
२५ शिक्रापूर जातेगाव न्यू