अलका कुबल यांनी दिला माळीणवासीयांना धीर
By Admin | Published: December 10, 2014 11:09 PM2014-12-10T23:09:55+5:302014-12-10T23:09:55+5:30
‘नियतीच्या पुढे कोणाचेच चालत नाही; पण तुम्ही धीर सोडू नका. आम्ही सर्व जण तुमच्यासोबत आहोत
पुणो : ‘नियतीच्या पुढे कोणाचेच चालत नाही; पण तुम्ही धीर सोडू नका. आम्ही सर्व जण तुमच्यासोबत आहोत. आपण पुन्हा एकदा गाव उभं करू या,’ असे आत्मीयतेचे बोल अभिनेत्री अलका कुबलने उच्चारताच माळीणवासीय बांधवांच्या चेह:यावर कृतज्ञतेचे भाव उमटले. मराठी चित्रपटसृष्टीत गेली अनेक दशके आपल्या भूमिकांनी विशेषत: महिला वर्गावर छाप उमटविणा:या या अभिनेत्रीने नुकतीच माळीणवासीयांना भेट दिली आणि त्यांच्यासोबत संवाद साधला.
या प्रसंगी तेथील भगिनींनी पारंपरिक पद्धतीने अलका कुबल यांची साडीचोळी देऊन ओटी भरली. यामुळे अलका कुबल भारावून गेल्या. पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने माळीणवासीयांना भावनिक व मानसिक आधार देण्यासाठी ‘चला माळीण पुन्हा उभारू या’ हा प्रकल्प सुरू आहे. याअंतर्गत अलका कुबल यांच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्पाचे समन्वयक व भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद भोई यांनी प्रकल्पात विविध क्षेत्रंतील मान्यवर मंडळी सहभागी झाल्याचे सांगितले.
या प्रसंगी भोई प्रतिष्ठानच्या वतीने माळीणवासीयांसाठी उभारण्यात आलेल्या ग्रंथालयाला या प्रकल्पात सहभागी झालेले अॅटलांट (अमेरिका) येथील स्थायिक मंदार जोशी यांच्या हस्ते पुस्तके प्रदान करण्यात आली. पुण्यातील कलाविष्कार संस्थेच्या छोटय़ा मुलांनी खास माळीणवासीयांसाठी हाताने बनविलेल्या शुभेच्छापत्रंचे वाटप अलका कुबल यांच्या हस्ते करण्यात आले.
माळीण येथील भालचिम विद्यालयाच्या मैदानावर तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या शेडमध्ये हा कार्यक्रम झाला. या परिसरातील अनेक वाडय़ावस्त्यांमधील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. भोई प्रतिष्ठानच्या शुभांगी आफळे, विजय पोटफोडे, प्रताप निकम, दीपक वनारसे आदी मान्यवर यात सहभागी झाले होते.
माळीणचे ग्रामस्थ सावळाराम लेंभे, तुकाराम लेंभे, मच्छिंद्र झांजरे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनास साह्य केले. (प्रतिनिधी)