राज्यात आता सर्व बस इलेक्ट्रिक करू; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 05:54 AM2023-08-13T05:54:47+5:302023-08-13T05:55:43+5:30
राज्यातील वाहतुकीच्या सर्व बस येत्या पाच वर्षांत इलेक्ट्रिक करण्यात येतील, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : देशाला पेट्रोल आणि डिझेलमुक्त करण्यासाठी मी काम करत आहे. इथेनॉल वापरासाठी मी आग्रही आहे. यासह राज्यातील वाहतुकीच्या सर्व बस येत्या पाच वर्षांत इलेक्ट्रिक करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पुण्यातील राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील (एनडीए चौक) एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प, खेड व मंचर रस्ता चौपदरीकरणाचा लोकार्पण कार्यक्रम शनिवारी पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.
रिक्षांना पूर्णपणे प्रदूषणमुक्त करणे, हायड्रोजन आणि इथेनॉल वापरास प्राधान्य देणे, कचऱ्यापासून वीजनिर्मितीऐवजी ग्रीन हायड्रोजन तयार केला जावा, असा आमचा प्रयत्न आहे, असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.